उद्धव ठाकरे कोव्हिड पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं भर पत्रकार परिषदेत जाहीर केलं. बुधवारी (22 जून) पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
नाहीतर माझा चेहरा पाहून किंवा बसलेला आवाज पाहून काही लोक वेगळा अर्थ काढतील. पण हे कोव्हिडचे दुष्परिणाम आहेत.” मग कोरोनाची लागण झालेली असताना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) शिवसैनिकांच्या गर्दीत कसे गेले? नेत्यांना कसे भेटले? ते खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहेत की त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
कोरोनाची बाधा तरी भेटीगाठी?
शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे बुधवारी पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच बोलले.
साधारण पाच वाजता त्यांची पत्रकार परिषद सुरू झाली.
ही परिषद संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी थेट वर्षा या निवासस्थानी पोहचले.
तेव्हाही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की, मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना भेटण्यासाठी कसे गेले.
ही भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे तिथेच शिवसैनिकांनाही भेटले.
Smart News:-
संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा!
जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान!
हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू!
‘उद्धवजी, माझं घर तोडलं होतं तुम्ही…’ कंगनाचा तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत!