आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस म्हणतात आम्हाला गधाधारी म्हणतात. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी(CM) फडणवीसांना सणसणीत टोला लगावला.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एक सभा झाली. त्यावेळी त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघालं. मुंबई स्वतंत्र करू म्हणाले. मुंबई स्वतंत्र करू म्हणायला ती काय पारतंत्र्यात आहे का, असा सवाल ठाकरेंनी(CM) उपस्थित केला. मूळात भाजप आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय? स्वातंत्र्यावेळी भाजप नव्हता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता. पण त्यांचा स्वातंत्र्य लढाईत सहभागी नव्हता, असं ठाकरे म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी जनसंघ अस्तित्वात होता. मात्र त्यांचा लढ्यात सहभागी नव्हता. उलट निवडणुकीत हेच जनसंघवाले सर्वात आधी जागांवरून भांडले आणि बाहेर पडले. शिवसेना २५ वर्षे युतीत सडली हे मी म्हटलं होतं. आता त्यांचा भेसूर आणि बेसूर चेहरा रोज पाहतोय. आम्ही अशा लोकांसोबत २५ वर्षे काढली यावर विश्वास बसत नाही, असं ठाकरेंनी म्हटलं.
IPL सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचा थेट पाकिस्तानशी संबंध! CBI तपासात 3 जणांना अटक
आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय
सांगली: पंचकल्याणचा निधी शिक्षणावर खर्च करा, महास्वामीजींचे आवाहन