दसरा मेळाव्याच्या निकालावर भुजबळ काय म्हणाले ? निशाणीचं समजू शकतो पण…

Dussehra meeting

दसरा मेळाव्याबाबत(Dussehra meeting) सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला असा सल्लाही भुजबळ यांनी शिंदे आणि ठाकरेंना दिला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दसरा मेळाव्याच्या निकालावर भाष्य केले आहे. दसरा मेळाव्याबाबत आता प्रश्न मिटला असून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क बाबत परवानगी मिळायला पाहिजे असा आग्रह होता. शेवटी त्यांना ते मिळालं असे भुजबळ यांनी म्हंटलं आहे. याशिवाय बीकेसी ग्राऊंड पण मोठे आहे. शिंदे तिकडे करणार आहे. कोणी इकडे घ्या तिकडे घ्या फरक पडत नाही. निशाणीचा विषय असता तर समजू शकतो तिथं मतदान असतं. पण सभेच्या जागेसाठी भांडण असायचे कारण नव्हतं असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. यावेळी भुजबळ यांनी शिवसेनेत असतांना मी देखील शिवतीर्थावर भाषण करायचो असे सांगत दसरा मेळाव्याबाबतची आठवण बोलून दाखवली आहे.

दसरा मेळाव्याबाबत(Dussehra meeting) सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला असा सल्लाही भुजबळ यांनी शिंदे आणि ठाकरेंना दिला आहे.

अलीकडे सोशल मीडिया असल्याने चिन्हाचाही फरक पडत नाही पण मेळाव्यावरुण भांडण नको असे देखील भुजबळांनी म्हंटले आहे.

शेवटी मीडियावरून हे सगळं महाराष्ट्र बघणार आहेच पण दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे त्यासाठी ही सगळं घडल्याचेही भुजबळांनी बोलून दाखवलेय.

छगन भुजबळ हे शिवसेनेत असतांना त्यांनी दसरा मेळावा हा जवळून बघितला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण देखील ऐकले असून त्यांनी देखील दसरा मेळाव्यात भाषण केल्याची आठवण सांगितली आहे.

नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थानी माध्यमांशी बोलतांना भुजबळांनी दसरा मेळाव्यात(Dussehra meeting) प्रतिक्रिया देत शिंदे आणि ठाकरेंना वडीलकीचा सल्लाही दिला आहे.