मसूर हे भारतीय खाद्यपदार्थांचे मुख्य अन्न असून जेवणाची थाळी त्याशिवाय अपूर्ण वाटते. (dhaba)जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अनेकदा आपण घरी मसूरची डाळ बनवतो. पण रेस्टॉरंट्स किंवा ढाब्यांमध्ये मिळणाऱ्या चविष्ट मसूराच्या डाळीशी त्याची चव जुळत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ढाब्यामध्ये येणाऱ्या चवीसारखी चव घरी बनवलेल्या डाळीला येत नाही. पण गृहणींनो काळजी नको, आज आम्ही तुम्हाला ढाबा स्टाईल डाळींचे पदार्थ बनवण्याची पाककला सांगणार आहोत.

दाल तडका
सर्वप्रथम तूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. तुम्हाला हवे असल्यास त्यात तुम्ही मसूर डाळही घालू शकता. आता एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात आता अर्धा चमचा जिरे आणि लाल मिरच्या घाला. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि आले घाला. २-३ बारीक चिरलेले कांदे आणि हिरव्या मिरच्या घाला. आच कमी करा आणि कांदा सोनेरी होईपर्यंत तळा. कांदा सोनेरी रंगाचा झाला की, मग नंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला.
एक कप टोमॅटो आणि मीठ घालून मिक्स करावे. ते चांगले शिजेपर्यंत ढवळावे. शिजलेली डाळ गॅसवर ठेवा आणि नंतर हे मिश्रण डाळीत घालून २ ते ३ मिनिटे डाळ शिजू द्या. कोळशाचा एक छोटा तुकडा पेटवून घ्या. तो कोळसा एका छोट्या भांड्यात ठेवून डाळीच्या मध्यभागी ठेवा. कोळशावर शुद्ध देशी (dhaba)तूप लावून लगेच झाकून ठेवा. त्यामुळेडाळीला स्मोकी चव येईल. शेवटी तुपात जिरे आणि हिंग टाकून फोडणी तयार करा आणि ते शिजवलेल्या डाळीवर घाला.
दाल मखनी
भिजवलेला राजमा आणि उडीद डाळ शिजवून घ्या. रुईने डाळ घुसळून घ्यावी. त्यानंतर कढईत बटर गरम करा, त्यात त्यात जिरे आणि हिंग घाला. त्यात हिरवी मिरची, दालचिनी, वेलची, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.नंतर आले लसूण पेस्ट, लाल तिखट आणि टोमॅटो घालून शिजेपर्यंत तळून घ्या. त्यानंतर घुसळलेली डाळीत मसाल्याचं मिश्रण घाला. ते घालून डाळ २ ते ३ मिनिटे शिजू द्या.
पालक डाळ
डाळ प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. पालकाची पाने धुवून बारीक चिरून घ्या. कढईत तूप आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण ठेवा. जिरे आणि लाल मिरच्या घालून तळून घ्या; बारीक(dhaba) चिरलेला लसूण आणि आले त्यात टाका. नंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर टोमॅटो घाला आणि ते चांगलं एकजीव झाल्यानंतर चिरलेला पालक घाला आणि चांगले शिजवा.
नंतर त्यात शिजलेली डाळ घाला. फोडणी स्वतंत्रपणे दुसऱ्या भांड्यात तयार करा. या फोडणीत तुप घाला, त्यात जिरे, मोहरी, हिंग, लसूण घालून फोडणी करा. त्यानंतर ही फोडणी डाळीत घाला. त्यानंतर तयार होईल ढाबा स्टाईल पालक डाळ.
हेही वाचा :
‘हा’ नेता पडला 24 वर्षीय तरूणीच्या प्रेमात, गर्लफ्रेंडला सोबत घेऊन केलं हादरवणारं कृत्य
रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा झटका
संतापजनक! शाळेच्या संस्थाचालकाने गाठली अत्याचाराची परिसीमा; विद्यार्थिनीवर एकदा नव्हे तर तब्बल…