शरद पवारांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

विधानसभा(assembly) निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक सर्व्हे समोर येत आहेत. कधी महाविकास आघाडी तर कधी महायुतीच्या पारड्यात सत्तेचा कौल दिला जात आहे. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बंजखोरांसह भाजपलाही धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा(assembly) निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युती होण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळेच या राष्ट्रपती राजवटीमागची खेळी भाजपचीच असल्याचं बोललं जातं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच अप्रत्यक्षपणे भाजपवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं होतं. मात्र या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. फडणवीस यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

२०१९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. “भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं. परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हतं.

याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.” असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केला आहे.

१० नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्या वेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर सरकार स्थापन करू. . राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. त्यानंतर भूमिका घेईन. महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही भाजपच्यासोबतच आहोत, असं शरद पवार म्हणाल्याचा दावाही फडणवीसांनी केला. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं.”

राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं.

पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्याद्वारे २०१९ च्या राष्ट्रपती राजवटीसाठी शरद पवार यांनाच जबाबदार ठरवलं आहे.

हेही वाचा :

“मुंबई सोडून सेल्समनची नोकरी; दोन वेळच्या जेवणाची भ्रांत ते यशस्वीचा संघर्ष – भावाच्या हालअपेष्टांची कहाणी”

पाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा

सावधान! Whatsapp वर आलेलं ‘ते’ लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं