उत्तर भारतातील संगमनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयागराज इथं सध्या महाकुंभमेळा सुरू असून, या महापर्वाचा प्रवास आता सांगतेच्या दिशेनं होत आहे. यंदाचा महाकुंभ काही सामान्य चेहऱ्यांनाही प्रसिद्धीझोतात आणताना दिसला त्यातलंच एक नाव म्हणजे मोनालिसा भोसले. मुळची मध्य प्रदेशातील असणारी मोनालिसा महाकुंभमध्ये माळा विकत असतानाच तिच्या गव्हाळ वर्णावर आणि घाऱ्या डोळ्यांवर अनेकांचीच नजर खिळली आणि रातोरात ती सोशल मीडियावर(film) चर्चेचा विषय ठरली.

लोकप्रियतेचा हा प्रवास तिला कलाजगतापर्यंत आणण्यास कारणीभूत ठरला आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला ‘डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटासाठी(film) निवडल्याचं म्हटलं गेलं. पण, निर्माते जितेंद्र नारायण सिंह म्हणजेच वसिम रिझ्वी यांनी मात्र मिश्रांवर काही गंभीर आरोप लावले.
कथित स्वरुपात मोनालिसाचं प्रशिक्षण घेणाऱ्या सनोज मिश्रा यांच्यावर रिझ्वीनं गंभीर आरोप करत ते एक मद्यपी असल्याचंही म्हटलं. ‘मिश्रा चित्रपटात भूमिका देतो सांगून अशाच मुलींना मुंबईत आणतो आणि त्यांच्याशी गैरवर्तणूक करतो’, असा गंभीर आरोप लावत मिश्राचा आतापर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्टच सांगितलं.

‘डायरी ऑफ मणिपूर’च्या नावाचा वापर करत मिश्रा सध्या मोनालिसाला विविध कार्यक्रमांना नेत आहे. इतक्यावरच न थांबता मोनालिसाला कोणाच्याही सोबत पाठवण्याआधी तिच्या कुटुंबीयांनी मिश्राविषयीची माहिती घ्यायला हवी होती, असं सूचक वक्तव्य रिझ्वीनं करत चित्रपटाच्या(film) चित्रीकरणालाही सुरुवात झालेली नाही.
एकिकडे रिझ्वी यांच्याकडून सनोज मिश्रा यांच्यावर आरोप केले असतानाच दुसरीकडे खुद्द मोनालिसाचीही प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे. मिश्रा यांनी रिझ्वींसोबतचा आपला वाद चव्हाट्यावर आणत त्यांच्यावर आरोप केले. काही माध्यमांनी मोनालिसाच्या व्हायरल व्हिडीओंचा संदर्भ देत तिनंच दिलेल्या माहितीनुसार ती मध्य प्रदेशातच असून, अभिनय शिकत असल्याचं सांगितलं. ‘ते मला मुलीसमान वागवतात. त्यांच्याविषयी जे काही सांगितलं जातंय ते खोटं आहे’, असं मोनालिसा म्हणाल्याचंही म्हटलं जात आहे.
हेही वाचा :
प्रेमात विश्वासघात, घटस्फोट; आता दुसऱ्यांदा रश्मी देसाई चढणार बोहल्यावर?
महाशिवरात्रीपासून या राशीच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, यश आणि वैवाहिक सुख
इथे गांजा सहज मिळतो युवा पिढीला पोखरतो