बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड फेम अभिनेत्री पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात दिसणार एकत्र, पोस्टरने वेधलं लक्ष!

अभिनेत्री पूजा राठोड बनली ‘बायडी’, गण्याचं पोस्टर प्रदर्शित

मराठी व हिंदी चित्रपट सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड चित्रपट तसेच बंजारा गाण्यांमध्ये(song) दिसणारी सुंदर अभिनेत्री पूजा राठोड यांचे नवीन वर्षात ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.

नुकतचं त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचा पोस्टर आणि प्रोमो शेयर केला आहे. बायडी या गाण्याच्या पोस्टरमध्ये अभिनेता पुष्कर जोग रिक्षावाल्याच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर अभिनेत्री पूजा राठोड ही सालस रूपात गावाकडच्या मुलीच्या गेटअप मध्ये दिसली आहे. त्यामुळे गाण्याच्या पोस्टरने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

पुष्करने या आधी बिग बॉस मराठी हा रियालिटी शो तसेच तू तू मै मै, वचन दे तू मला, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या टेलिव्हिजन मालिका आणि वेल डन बेबी, जबरदस्त, ती आणि ती, बापमाणूस, मुसाफिरा असे अनेक मराठी हिंदी चित्रपट केले आहेत. तर अभिनेत्री पूजा राठोड हिने अल्याड पल्याड चित्रपट आणि विशेष म्हणजे तिची सोनेरो भुरिया, सोकेवलो साडो, नीलो कालो फेटिया अशी बरीच बंजारा गाणी प्रसिद्ध आहेत.

‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. तर गाण्याचे(song) दिग्दर्शक अभिजीत दाणी हे आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. बायडी गाण्याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Pushkar Jog Post Link – https://www.instagram.com/p/DET6nKuNph9/?igsh=bjMzb2VmMDJmaGxs

Pooja Rathod Post Link – https://www.instagram.com/p/DEWhx1GIMoX/?igsh=bnJybmRiZzEyODMz

Promo Link – https://yt.openinapp.co/ukgiq

Promo Link – https://youtu.be/mCTLR_eV1ZM?si=q4tabHkNbDpUhnZH

हेही वाचा :

मविआला अचानक यायला लागला महायुतीचा पुळका…

‘आपण कदाचित रोहित शर्माला…’, गावसकरांचं भाकीत! रवी शास्त्रीही म्हणाले, ‘टॉसदरम्यान…’

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी