हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ(video) प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.
गांधीनगर : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री ते गांधीनगर येथील गुजरात भाजप मुख्यालयात पोहोचले. मोदी साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरात निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी गांधीनगर येथील गुजरात भाजप मुख्यालयाला भेट दिली.(video)
भाजपच्या सांगण्यावरूनच विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवताहेत, चंद्रहार पाटलांचा आरोप
सांगली : विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले, त्यांच्या उमेदवारीचा एक टक्काही आम्हाला तोटा होणार नाही. ते भाजपची ‘बी’ टीम आहे. भाजपच्या सांगण्यावरूनच ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.
बंगळूर : काँग्रेसच्या उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज (ता. २) शिमोगा येथे येणार आहेत, असे जिल्हापालक मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह महत्त्वाचे नेते प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि राहुल गांधी दुपारी १२ वाजता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आज गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज शिमोगा येथे येणार आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने तुरुंगात आत्महत्या केलीये. हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती
सांगलीत जागा गमावली तरी काँग्रेसमध्ये आणखी एका नेत्याचा उदय
मंडलिक, मानेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे बेरजेचे गणित; कोल्हापुरात ठरणार रणनीती