ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, शिंदे गटात प्रवेश करा अन्यथा…

रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान(blast tool) झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यातील वाद रंगला आहे. किरण सामंत यांनी राजन साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मला खासदार करायचे की नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार(blast tool) बनवायला शिंदे, फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी, असं वक्तव्य शिवसेनेचे किरण सामंत यांनी केले आहे. किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असं वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

आता मात्र राजन साळवींच्या वक्तव्यावर किरण सामंत यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत आमदार राजन साळवी यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. भविष्यात लांजा राजापूर मतदारसंघ महाआघाडीकडून कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी असा सल्ला किरण सामंत यांनी दिला आहे.

भविष्यात मी निवडणूक लढवली तर धनुष्यबाण याच चिन्हावर लढवेन. राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन असा इशारा देखील किरण सामंत यांनी राजन साळवी यांना दिला आहे. या सगळ्या विषयासंदर्भात आमदार राजन साळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा :

OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? Video Viral

करीना कपूरच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

हेलिकॉप्टरने एंट्री, कॉलर उडवून फ्लाईंग किस, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा