चिकन फ्राय रेसिपी

खूप चविष्ट आणि क्रिस्पी खाणाऱ्यांसाठी हा फ्राय आहे. एक मधुर भूक, जेवणाच्या मेजवानीसाठी योग्य. सोबत तांबडा-पांढरा रस्सा असेल तर चिकन फ्रायसारखा चविष्ट पदार्थ दुसरा नाही. chiken fry recipe तुम्ही पण ट्राय करा. खाली आपण ४ प्रकारे चिकन फ्राय करायला शिकणार आहे.
चिकन स्वच्छ धुवा.
आपल्या उष्णतेच्या पसंतीनुसार मसालेदारपणा समायोजित करा.
पॅन ओव्हरलोड करू नका, त्यांना बॅचेसमध्ये तळून घ्या.
चिकन फ्राय करून पहा. हे कसे करावे हे जाणून घेऊया.
चिकन फ्राय chiken fry recipe रेसिपीसाठी साहित्य
अर्धा किलो चिकन
- १ वाटी मैदा
- १ अंडे
- १ वाटी दूध
- १ मोठा चमचा वितळून घेतलेले लोणी
- तळण्यासाठी तेल
- अर्धे लिंबू
- मसाला १/४ चमचा काळी मिर पूड.
चिकन फ्राय कृती
Step 1
चिकनचे मोठे तुकडे करावेत. धुऊन त्याला मीठ लावून लिंबू पिळून ठेवावे. हे तुकडे थोडा वेळ मुरु द्यावेत.
Step 2
नंतर पातेल्यात तसेच मध्यम अग्नीवर शिजायला ठेवावेत. शिजवताना झाकण ठेवावे.
Step 3
पाणी चांगले आटवून घ्यावे. पाणी आटले, की पातेले खाली उतरवून घावे. दूध, मैदा, लोणी, अंडे, थोडे मीठ, काळी मिरी घालून मिश्रण चांगले भरपूर फेटून घ्यावे.
Step 4
कढईत तेल गरम करायला ठेवावे. चिकनचे तुकडे मिश्रणात बुडवून बदामीसर रंगावर तळून घ्यावेत. गरम गरमच खायला द्यावे. अंडे घातले नाही तरी चालते.
हेही वाचा :