Recipe : तोंडाला पाणी सुटणाऱ्या कैरीचे पन्ह

उन्हाळा म्हटलं की, सर्वत्र आपल्याला आंबे (Mango) आणि कच्ची कैरी (recipe) यांचा मोसम दिसू लागतो. लहानपणी शाळेच्या अवतीभोवती चिंचवाल्याकडे ही कैरी अगदी तिखट-मीठ लावून आपल्याला खायला मिळायची. कधीतरी शाळेलगत (School) असणाऱ्या झाडांवर तीच अस्तित्व पाहायला मिळायचं. कच्च्या कैरीला तिखट-मीठ लावून कुणाला खायला आवडणार नाही.
उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि आपले जेवण अधिक रुचकर बनवण्यासाठी आपण कच्च्या कैरीचा भरपूर प्रमाणात वापर करतो. कैरीपासून लोणची, पन्ह, चटणी खाल्ली जाते. कडाक्याच्या उन्हात कैरी खाल्ल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच पण आंब्याचा रस उष्माघात टाळण्यासही मदत करतो. लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनाच कैरीची चव आवडते.(recipe)
कैरीचे पन्ह बनवण्याची पद्धत सोपी असली तरी कमी वेळात तयार होते. बाजारात अनेक प्रकारचे पन्ह मिळतात पण घरगुती पन्ह कसे बनवायचे ते पाहूया
पन्ह बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
आवश्यकतेनुसार कच्ची कैरी
भाजलेले जिरे पूड
गूळ/साखर
काळे मीठ
चाट मसाला
पुदिन्याची पाने
मीठ चवीनुसार
वरील सर्व साहित्य आवश्यकतेनुसार व चवीनुसार घ्यावे
कृती –
कैरीचे पन्ह बनवण्यासाठी प्रथम कैरी नीट धुवून घ्या. यानंतर प्रेशर कुकरमध्ये कैरी टाकून उकळायला ठेवा. ४ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवा. कैरी थंड झाल्यावर तिला पिळून घ्या. कैरीचा पल्प हाताच्या साहाय्याने चांगला मॅश करा आणि त्यात बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, किसलेला गूळ किंवा साखर, जिरेपूड, काळी मिरी, काळे मीठ, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले मिसळा. हे तयार मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन आणि गरजेनुसार पाणी (Water) घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अशा प्रकारे आंबट-गोड पन्ह तयार होईल. बर्फाच्या तुकडे घालून सर्व्ह करा.
हेही वाचा :