स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीच्या(Recruitment) संधीची प्रतीक्षा करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! आता आणखीन प्रतीक्षा करत बसलात तर हातून सोन्याची संधी सुटून जाईल. कारण SBIने सुरु केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली आहे. उमेदवारांना २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, जर तुम्ही या भरतीसाठी प्रयत्न करत आहात तर उद्या शेवटची तारीख असल्याची नोंद घ्यावी आणि काळजीपूर्वक घाई करावी. चला तर मग या भरतीविषयक काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

SBIने मॅनेजर तसेच Dy. मॅनेजरच्या पदासाठी ही भरती(Recruitment) आयोजित करण्यात आली आहे. एकूण ४२ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागणार आहे. या संबंधित जाहीर करण्यात आलेले अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. १ फेब्रुवारी २०२५ तारखेला या भरतीच्या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. तसेच उमेदवारांना या तारखेपासून राज करण्याची मुभा देण्यात आली होती. ही मुदत २४ फेब्रुवारी २०२५ या तारखेपर्यंत देण्यात आली आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये भरावे लागणार आहे. तर OBC आणि EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज अगदी निशुल्क करता येणार आहे. तसेच PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज अगदी निशुल्क करता येणार आहे. कोणत्याही रक्कमेची भरपाई करायची गरज नाही.

उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तर उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. मॅनेजरच्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय २६ निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ३६ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. Dy. मॅनेजरच्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय २४ वर्षे तर जास्तीत जास्त वय ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
काही चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात उमेदवाराला शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यांनतर उमेदवारांना मुलखात द्यावी लागणार आहे. दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय चाचणीला पात्र करत उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
हेही वाचा :
गुरु रंधावा रुग्णालयात दाखल; गंभीर जखमी
चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Viral
कोल्हापूर : ‘मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा….