सरकारचा मास्टर प्लॅन : ५ हजार जागांवर नोकरीची संधी

तुम्ही जर सरकारी नोकरी (job) शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. पदवीधरांसाठी सरकारी, विविध संस्था तसेच बॅँकेमध्ये तब्बल ५ हजारहून अधिक जागांसाठी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी तसेच राज्यातील तसेच केंद्रीय स्तरावरील विविध संस्था, पोलिस रेल्वे विभाग तसेच इतर क्षेत्रात नोकर भरती प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. त्या त्या विभागानुसार माहिती घेतली तर आपल्याला वेळेत अर्ज सादर करण्यास मदत होईल.
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेमध्ये आयुर्वेद विशेषज्ञ, आयुर्वेदिक जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर, आयुर्वेद फार्मासिस्ट आणि पंचकर्म थेरपिस्ट या पदांच्या एकूण ३१० आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे आहे. एमपीएससीतर्फे उच्च श्रेणीतील लघुलेखक (मराठी/ इंग्रजी), निम्न श्रेणीतील लघुलेखक (मराठी/ इंग्रजी) आणि लघुलेखक (मराठी/ इंग्रजी) या पदांच्या २५३ जागांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी १२ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक संचालक, उपसंचालक या पदांसाठी ८१ जागांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी ९ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये २६ जागांसाठी भरती होणार असून वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी थेट मुलाखतीतून निवड केली जाणार आहे. १० ते १४ मे दरम्यान वेळापत्रकानुसार मुलाखती होणार आहेत.(job)
अशी असेल विविध ठिकाणची भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २५३ जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल – सहाय्यक कमांडंट (गट अ), सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस आणि सशस्त्र सीमा बलमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे एकूण ३,६०३ जागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या विभागासह इतर संस्था आणि बॅँकांमध्ये अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. संबंधित जाहिराती ऑनलाइन उपलब्ध आहेत.
Smart News:-
उत्तर प्रदेशातील लाऊडस्पीकर हटवण्यावरुन राज ठाकरेंनी केले योगींचे कौतुक
राज्यात तूर्तास मास्क सक्ती नाही : राजेश टोपे
कोल्हापूर: शहर परिसरात वळीव पावसाची हजेरी