मुली ‘या’ गोष्टी आपल्या जोडीदारापासून नेहमीच लपवतात

जेव्हा एखादे जोडपे रिलेशनशिपमध्ये (relationship) येते, तेव्हा त्यांना आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायला खूप आवडते. ते जोडपं एकमेकांच्या प्रेमात असं काही बुडतं की, त्यांना दुसरं काहीच सुचत नाही. अशावेळी बहुतेकदा ते आपल्या जोडीदारासोबत सर्व काही शेअर करतात. बऱ्याचदा मुलींना मुलांबाबत हे जाणून घेण्यात खूपच इंट्रेस्ट असतो की, तिच्या आधी त्या मुलाच्या आयुष्यात कोणती मुलगी आली होती का? किंवा तिच्या प्रियकराचे किंवा नवऱ्याचे ती भेटण्यापूर्वी कसं आयुष्य होतं. मुलांनाही त्यांच्या गर्लफ्रेंडकडून किंवा बायकोकडून हीच अपेक्षा असते.
कोणतीही मुलगी आपल्या जोडीदारासोबत (relationship) सगळ्याच गोष्टी शेअर करत नाही. तिच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात, जे ती आपल्या नवरा किंवा बॉयफ्रेंडसोबत कधीही शेअर करु शकत नाही. आता त्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घ्या.
क्रश बद्दल लपणे
कोणती मुलगी तिच्या जोडीदारासमोर तिच्या क्रशचा उल्लेख करत नाही आणि केलाच तरी त्यांच्याबद्दल उघडपणे बोलत नाही. ती तिच्या क्रशबद्दल फारशी माहिती तिच्या पार्टनरसोबत शेअर करत नाही. तर काही वेळी ती तिच्या क्रशचे नावही देखील आपल्या जोडीदाराला सांगत नाही.
मैत्रिणींशी खाजगी चर्चा
मुली अनेकदा त्यांच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवतात. त्या भेटल्या की, त्यांच्यात खूप गप्पागोष्टी होतात. परंतु त्या गोष्टी मुली कधीही आपल्या जोडीदाराला सांगत नाही.
पुरुष मित्रांशी मारलेल्या गप्पा
कदाचित तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोचे काही पुरुष मित्र असतात. बहुतेक मुली त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या पुरुष मित्रांबद्दल सांगत नाहीत. भलेही मुली तुम्हाला त्यांच्या मित्रांबाबत सांगतील. परंतु सगळ्याच गोष्टीत्या आपल्या जोडीदाराला सांगत नाही. मुलींना ही भीती असते की, ते त्यांच्या पुरुष मित्रांशी ज्या प्रकारे संवाद साधतात, त्यांचा जोडीदार देखील त्याच्या मैत्रिणींसोबत मारु शकतो.
EX किंवा प्रेमाबद्दल
मुलींना त्यांच्या EX किंवा त्याच्याशी असलेल्या नात्याबद्दल बोलणे फारसे आवडत नाही. ब्रेकअपनंतर ती पुढे गेली आहे, परंतु तिला जोडीदारासमोर त्याच्याबद्दल उल्लेख केला नाही.
सौंदर्याच रहस्ये
महिला मेकअप किंवा काही प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट वापरतात. पण ही गोष्ट त्या कधीच आपल्या पार्टनरसमोर शेअर करत नाहीत. ती नेहमी तिच्या सौंदर्याचे रहस्य लपवते आणि नैसर्गिक सौंदर्याप्रमाणे मेकअप दाखवते.
नातेवाईकांबद्दल खरे विचार
मुली अनेकदा आपलं कुटुंब, आई-वडील, भावंडं आणि चुलत भाऊ-बहिणी इत्यादींची प्रशंसा करतात. पण त्या आपल्या कुटुंबासोबतचे भांडण किंवा नातेवाईकांच्या उणीवा जोडीदारासमोर लपवतात. कुटुंबाबद्दलचे तिचे खरे विचार ती तिच्या जोडीदारासोबत कधीही शेअर करत नाही.
हेही वाचा :