“लाडक्या बहिणींना दिलेली मदत परत?

छगन भुजबळ म्हणाले, लाडकी बहीण योजनेची मदत गरिबांना द्यायची होती. (internal revenue service)
ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत, त्यांना पेट्रोल महिन्याला 10 हजार लागत असतील, हे दीड हजार घेऊन काय करायचं आहे. घरकाम, शेतकाम आणि इतर कामं करणाऱ्या गरीब महिलांसाठी ही योजना आहे, असं भुजबळ म्हणाले.लाडकी बहीण योजनेबाबत वारंवार निर्माण होणारा संभ्रम दूर होण्यासाठी भुजबळ यांनी सरकारला एक सल्ला देखील दिला.

चारचाकी वाहन ज्यांच्या नावावर असेल त्याबाबतची पडताळणी सुरु करण्यात येत आहे त्याबाबत विचारलं असता ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, तुमचे काय नियम असतील ते टीव्हीवर येऊ द्या, नियमात बसतील त्यांनी मदत घ्यावी, नियमात जे बसत नाहीत त्यांनी मदत सोडावी नियम काय (internal revenue service)आहेत याची वर्तमानपत्रात जाहिरात देता येईल. मात्र ते काही कुणी करताना दिसत नाही असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 7 हप्त्यांचे 10500 रुपये महिलांना मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणपणे 2 कोटी 40 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाली आहे.

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी संख्या सुमारे अडीच कोटींवर पोहचली आहे., यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहेत. त्या महिलांना या योजनाचा लाभ सोडावा लागणार (internal revenue service)आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन याबाबत पडताळणी सुरु झाली आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना दिलेली मदत परत घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!

“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला

Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत