OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? Video Viral

भाजप नेत्याच्या कार्यालयाबाहेर एक जोडपं(couples) रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्तीसगडच्या वैशालीनगर मतदारसंघातील हा प्रकार आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक जोडपं तन्मयतेने एकमेकांचे चुंबन घेत आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जलेबी चौकामध्ये भाजप नेत्याचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या एका मजल्यावर अज्ञात जोडपं(couples) रोमान्स करत आहे. सदर प्रकाराचा व्हिडिओ एकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. भाजप नेते आणि आमदार रिकेश सेन यांचे पोस्टर व्हिडिओमध्ये दिसत आहे.

रिपोर्टनुसार, रिकेश सेन यांनी परिसरातील OYO पुरस्कृत हॉटेल बंद पाडले आहेत. तरुण-तरुणी अशा हॉटेलमध्ये जात असल्याने सेन यांनी ओयो हॉटेल्स बंद पाडले आहेत. याचाच निषेध म्हणून जोडप्याने त्यांच्या ऑफीससमोरच रोमान्य केल्याची चर्चा आहे.

OYO रुमच्या नावाखाली जिथे-जिथे वैश्या व्यवसाय सुरु आहे ते सर्व सेन यांनी बंद पाडले आहेत. अशाठिकाणी सेन पोलिसांना घेऊन स्वत: पोहोचले होते आणि त्या ठिकाणी छापा टाकला होता. सेने OYO संस्कृतीच्या पूर्ण विरोधात आहेत.

काही दिवसांपूर्वी सेन यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये सेन सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणाऱ्या एका जोडप्याला झापताना दिसले होते. यामध्ये जोडपे सेन यांना म्हणताना दिसते की, ‘आम्ही कुठे जावं. कारण परिसरातील सर्व OYO हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत.’

हेही वाचा :

करीना कपूरच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘योगींची हकालपट्टी, अमित शहांना पंतप्रधान करण्याचा डाव’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

हेलिकॉप्टरने एंट्री, कॉलर उडवून फ्लाईंग किस, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा