आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून, नोंदणी अर्ज नव्याने करावा लागणार

आरटीईची(rte) प्रवेश प्रक्रिया आता शुक्रवारी, 17 मेपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसोबत महापालिकेच्या स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये हे प्रवेश होणार असून त्यासाठी पालकांना नव्याने नोंदणी अर्ज करावे लागणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

आरटीईच्या(rte) प्रवेशाची वेबसाईट ही 17 मेपासून सुरू होणार आहे. यापूर्वी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत आरटीईच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने काही बदल करून हे प्रवेश सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला काही संघटनांनी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या नवीन बदलाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देत सर्व प्रवेश पूर्वीप्रमाणेच खासगी शाळांमध्ये करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर मंगळवारी, 14 मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार होती. मात्र आरटीई प्रवेशासाठी सरकारी, अनुदानित शाळा वगळून खासगी शाळा, त्यांची संख्या नव्याने प्रवेश प्रक्रियेसाठीच्या यंत्रणेत जोडून घेण्यासाठी वेळ लागला असल्याने ही प्रवेश प्रक्रिया आता शुक्रवारी, 17 मेपासून सुरू होत आहे.


आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवर जिल्हानिहाय शाळा आणि त्यांच्या प्रवेश क्षमतेची सुधारित यादी जाहीर केली आहे. यानुसार राज्यातील 9 हजार 138 इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 1 लाख 2 हजार 434 जागांवर आरटीई प्रवेश होणार आहेत. पूर्वी राज्यातील 76 हजार 53 शाळांमधील आरटीईच्या 8 लाख 86 हजार 411 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ 69 हजार 361 पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज केले. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

“मोदींचा जे बोलतात तेच करतात” ; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं

माझ्या परवानगीशिवाय ‘भिडू’ शब्द वापरू नका!

मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत अनेक रस्ते बंद