सांगलीच्या विभुतवाडीत भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी!

विभूतवाडी तालुका आटपाडी येथे कराड पंढरपूर महामार्गावर बोअरवेल वाहतूक करणारा ट्रक (truck) व छोटाहत्तीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले. तर एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे.
महेश फडतरे व गणेश फडतरे अशी मृत दोघांची नावे आहेत. तर निशांत फडतरे (तिघेही रा. कोरेगाव, ता. सातारा) गंभीर जखमी असून त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. विभूतवाडी गावाच्या नजीक धोकादायक वळणावर समोरा समोर धडक होवून हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश, गणेश व निशांत फडतरे त्यांचे शेतकरी कृषी यंत्र नावाचे दुकान आहे. कृषी यंत्र साहित्य पोहोचवण्यासाठी ते विभूतवाडीला आले होते. साहित्य पोहचवून परत जाताना विभूतवाडी गावाच्या नजीकच पुलावर धोकादायक वळणावर त्यांच्या छोटा हत्तीची (truck) ट्रकला समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. यात जखमी महेश फडतरे व गणेश फडतरे यांचा मृत्यू झाला. तर निशांत फडतरे याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा :