सांगली: गाडीची काच फोडून ३७ तोळे सोने लंपास

gold

सांगली: सांगलीतील विजयनगर येथे पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी १४ लाख ८१ हजारांचे तब्बल ३७ तोळे सोन्यावर (37 ounces of gold) डल्ला मारला. सदरची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. याबाबत सिद्धेश विजय माने (वय २७ रा. ताराराणी कॉलनी, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर येथील बांधकाम व्यवसायिक सिद्धेश माने आपल्या कुटुंबीयांसमवेत भेंगळवारी बेडग येथे लग्नासाठी आले होते. विवाह विधी आटोपल्यानंतर ते मिरजेतील एमआयडीसी रोडवरील सासरच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले. रात्रीच्या दरम्यान सह भोजनासाठी ते आपले कुटुंबीय सोबत घेऊन विजयनगर येथील हॉटेल सेलिब्रेशन इथे आले. सिद्धेश यांच्या पत्नी माया माने यांनी अंगावरील सर्व दागिने काढून एका पर्समध्ये ठेवून ती पर्स गाडीमध्ये ठेवली.

गाडी लॉक करून सर्वजण जेवणासाठी हॉटेल मध्ये गेले. त्याच वेळी पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी गाडीची काच फोडून पर्स लांबवली. सदर पर्समध्ये ४ लाख रुपयांचे १० तोळे(gold) वजनाचे मंगळसूत्र, २ लाख रुपये किमतीचा ५ तोळ्यांचा एक नेकलेस हार, ४ लाखाचे १० तोळ्यांचे दोन तोडे. ४ लाखांच्या १० तोळे वजनाच्या चार बिलवर बांगड्या(gold), ८० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाची कानातील दोन कर्णफुले आणि १५०० रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण १४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

जेवण करून येताच गाडीची काच फुटलेली पाहून माने धावतच गाडीकडे आले. त्यांच्या पत्नीने गाडीमधील ठेवलेली पर्स चोरीस गेली आहे, हे लक्षात येताच त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करीत आहे.

Smart News:-

सलग 36 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव


Google ची कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी; तुम्हाला अडचण येईल? जाणून घ्या


प्रकाश आंबेडकरांनी आरपीआयचं अध्यक्षपद स्वीकारावं, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार : रामदास आठवले


आरोग्य जागर – गाजराचा रस


लसूण आणि मधाचं कॉम्बिनेशन वजन घटवण्यासाठी आहे बेस्ट उपाय; असं रोज सकाळी वापरा


 

Leave a Reply

Your email address will not be published.