सांगलीत हात पाय बांधून घातला दरोडा

सांगली : येथील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर भागात शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. (crime news) पाच ते सहा दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून हात पाय बांधून घालून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लांबविले. दरोड्याच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे

कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे आशिष चिंचवाडे कुटुंबासोबत राहतात. (crime news) शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच ते सहा जणांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील झोपलेल्या लोकांना उठवून घातक हत्यारांचा धाक दाखवला.कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधले. व चार लाखाचे सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने घेऊन लूट केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोड्याबाबाबत आशिष चिंचवाडे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दरोड्या प्रकरणी अनोळखी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने चिंचवाडे कुटूंबियांना धक्का बसला आहे.

हेही वाचा :