धक्कादायक !सांगलीमध्ये भर चौकात मुलानेच केला वडिलांचा खून!

सांगली  जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथे व्यसनाधीन वडिलांच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलानेच वडिलावर कोयत्याने हल्ला केला. (police investigation) या हल्ल्यामध्ये सुरेश भीमराव पाटील वय 54 यांचा मृत्यू झाला. यानंतर मुलगा प्रथमेश पाटील हा कुरळप पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना कुरळप पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भर चौकात घडली.

सुरेश पाटील हे गावातील एका खाजगी दूध संस्थेत सचिव म्हणून अनेक वर्षापासून काम करत होते. मात्र त्यांना गेल्या अनेक वर्षापासून दारूचे व्यसन होते. यातून ते कुटुंबाला सतत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून पत्नीने पंधरा वर्षांपूर्वी पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर आजी आजोबा या मुलांचा सांभाळ करत होते. वडील मात्र व्यसनाच्या आहारी जाऊन सतत कुटुंबाला त्रास देत होते. काल मंगळवारी दारू पिऊन सुरेश पाटील हे कुरुळप गावातील चौकात कट्ट्यावर बसलेले होते.

या दरम्यान त्यांचा मुलगा प्रथमेश याने येऊन वडीलाच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या नंतर मुलगा जवळच असणाऱ्या पोलीस ठाण्यात हजर झाला. जखमी वडीलास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखम खोल वर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस (police investigation) अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा :


मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *