धक्कादायक! सांगलीत विजयी उमेदवाराने केला तब्बल तीन हजार लिंबांचा उतारा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी तत्कालीन सत्ताधाऱयांनी जमिनीत लिंबू पुरून जादूटोणा (witchcraft) केल्याचा आरोप केला जात होता. दरम्यान, गावात सत्तांतर झाले. मात्र, सत्तेत आलेल्या नव्या पॅनेलच्या पुढाऱयांनी अंधश्रद्धेचा कळसच केला. गुलालाने माखलेले तब्बल तीन हजार लिंबू गावात फेकण्यात आले. यावर कहर म्हणून या लिंबांवरूनच गाडी चालवून जल्लोष करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

सांगली जिल्ह्यातील चुडेखिंडी गाव हे पूर्वी कायम दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. उन्हाळ्यात सर्वात अगोदर टँकरने या गावात पाणीपुरवठा केला जात होता. जलसंधारणाच्या कामांनंतर हे गाव पाण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले. विकासाच्या बाबतीत गाव पुढारलेले असले तरी अंधश्रद्धेमुळे हे गाव सामाजिकदृष्टय़ा अजूनही मागासलेलेच आहे, असेच म्हणावे लागेल.

आटपाडी शहरातील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा (witchcraft) करून उपचार करण्याचा प्रयत्न केला जात होता. या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

या प्रकाराबाबत संपतराव नामदेव धनवडे (वय 43, रा. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. तर या घटनेतील ख्रिस्ती धर्म प्रचारक संजय गेळे व त्यांची पत्नी अश्विनी गेळे त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ब्राम्हण समाज संघटनेने दिला आहे.

हेही वाचा :