सांगली : 800 शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरणार

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शैक्षणिक (ministry of education) कामकाजासह गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 800 शिक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यांच्या मानधनाची व्यवस्था 15 व्या वित्त आयोगातून केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल (ministry of education) स्कूल करण्यात येत आहे. एकीकडे मॉडेल स्कूलची चळवळ सुरू असताना दुसरीकडे शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे अनेक प्रश्न भेडसावत होते. शासनाकडून तीन वर्षांपूर्वी टीईटीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात आली होती. मात्र रिक्त जागेच्या तुलनेत झालेली भरती अपुरी होती. परिणामी आजही अनेक शाळेमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी होती. शासनाकडून अद्यापही भरती बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

याबाबत डुडी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात सुमारे 1 हजार 700 शाळा आहेत. या शाळेत 5 हजार 950 पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात 5 हजार 145 शिक्षक कार्यरत आहेत. आजही 805 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शासनाकडून शिक्षक भरतीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मॉडेल स्कूलची चळवळ गतिमान होण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यात 800 शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

वाळवा तालुक्यात काही शाळेत शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले आहेत. इतर तालुक्यात ऑगस्ट अखेरपर्यंत संपूर्ण रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या शिक्षकांचा पगार 15 व्या वित्त आयोगातून प्रति विद्यार्थी सुमारे 500 या प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती डुडी यांनी दिली.

Smart News :


इचलकरंजी: पंचगंगा नदीमध्ये विसर्जनास परवानगी द्यावी

Leave a Reply

Your email address will not be published.