सांगली: सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची घटनास्थळी भेट

Mass suicide

सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सोमवारी (दि.२०) एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या(Mass suicide) केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या आत्महत्या(Mass suicide) प्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यातच आज, बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हैसाळ येथील घटनास्थळी भेट दिली.

खासगी सावकाराकडून वारंवार होणारा अपमान, व्याजाच्या पैशासाठी तगाद्यामुळे वनमोरे कुटूंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी दिली आहे. याप्रकरणी १३ जणांना पोलिसांनी अटक केली असून फरार असलेल्या संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. अटक केलेल्यात डाॅक्टर, शिक्षक, एसटीवाहकाचा समावेश आहे.

आत्महत्या(Mass suicide) केलेल्या डाॅ. माणिक वनमोरे व त्यांचे बंधू पोपट वनमोरे यांच्या घरात प्रत्येकी एक चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीत खासगी लोकांकडून कर्जाने पैसे घेतले आहेत. त्या पैशाची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. हे कर्ज व्यापाऱ्यासाठी घेतले होते, असा उल्लेख आहे. पण किती रक्कम घेतली होती, याचा उल्लेख चिठ्ठीत नव्हता.

Smart News:-

शिवसेना भाजपची सत्ता येणार का?


नोराने दाखवला हॉट अवतार ;पण लोकांनी ट्रोल केलं अजय देवगणला!!


‘हिंदुत्वाशी काही देणघेण नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार’; इम्तियाज जलील यांचे टीकास्त्र


‘त्या’ बैठकीत काय घडलं? उद्धव ठाकरेंनी केला खुलासा.


शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे आवाहन!


Leave a Reply

Your email address will not be published.