संजय शिरसाट यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा गौप्यस्फोट

विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली(politics). कित्येक वर्ष शिवसेना आणि भाजपची असलेली पारंपरिक युती तुटली आणि विरोधात असलेले पक्ष परस्परांचे घट्ट मित्र बनले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही ऐतिहासिक घटना होती. शिवसेना पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने या सर्व घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं जाहीर करण्यात आलं.

खरंतर मुख्यमंत्री(politics) कोण होणार? यावरुन प्रचंड खलबतंदेखील झाली होती. पण पुढे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिवसेनेकडून सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या इतर दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला, असं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून याआधी सांगण्यात आलंय. पण शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी याबाबत वेगळाच दावा केला आहे.

“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत शरद पवार यांची कुठलीही हरकत नव्हती. हरकत उद्धव ठाकरेंची होती. वहिनींची इच्छा होती. तुम्ही मुख्यमंत्री बना म्हणून आणि त्यांना अजय चौधरी, रवींद्र वायकर यांनी सपोर्ट केला”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवार यांचा आग्रह नव्हता, असं संजय शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

“शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा मॅनेजमेंट एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं होतं आणि त्यांना सांगण्यातही आलं होतं की, तुला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर हे सर्व काम कर. त्यावेळी खर्च सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यावेळी पोलिसांकडून रेकी सुद्धा करण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, शिंदे साहेब मुख्यमंत्री होत आहेत म्हणून रेकी करत आहेत. मात्र स्वार्थ नडला. अजित पवार, सुनील तटकरे, सुनील प्रभू दुसरीकडून एक ग्रुप सक्रिय झाला. मग उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं नाव जाहीर करून घेतलं. पूर्वनियोजित सगळं करुन झालं. मी या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे”, असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.

“विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर(politics) भाजपचं कुठंही ऑब्जेशन नव्हतं. शेवटी साडेसात वाजेपर्यंत फोन येत होते. एकनाथ शिंदे बोलले. पहिले मुख्यमंत्री पद द्यायला ते तयार आहेत. त्यावेळी तुला जायचे असेल तर जा असं उद्धव ठाकरे बोलले”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला. तसेच “संघ कार्यकर्त्याला घडवत असतात. विचाराशी बांधिलकी असलेल्या लोकांना मदत करतात. संघाने ठरवलं तर कुणाला खुर्चीवर बसायचं, हे नेते ठरवू शकत नाही”, असं संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर म्हणाले.

मराठा नेते मनोज जरांगे यांना शरद पवार यांची फूस होती का? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. त्यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “फूस किती प्रमाणात होती हे संपूर्ण महाराष्ट्रने पाहिलं आहे. एकमेकांच्या विरोधात मानस उभा करणं यामध्ये शरद पावरांचा हातखांडा आहे. तिथंही तसेच केलं. मात्र सुदैवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरात काम केलं. त्यामुळे शरद पवारांना संधी साधता आली नाही”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

हेही वाचा :

तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

‘धोनीमुळे आपण जिंकलो, त्याने…,’ दिनेश कार्तिकचे शब्द ऐकताच ड्रेसिंग रुममध्ये पिकला हशा’