SBIच्या बंपर भरतीची अर्ज प्रक्रिया शेवटच्या टप्य्यात! आजच करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने डिसेंबर २०२४ मध्ये भरतीची घोषणा केली होती. १७ डिसेंबर २०२४ मध्ये या भरतीला सुरुवात करण्यात आली होती. मुळात, या भरतीसाठी (application)अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. ज्युनिअर असोसिएटच्या पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी (application)अर्ज केला आहे. मुळात, या भरतीच्या माध्यमातून एकूण १३,७३५ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आहात तर आजच्या आज या भरतीसाठी आपले अर्ज नोंदवा. संपूर्ण भारतभरात ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून ७०० रुपये भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे.

तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. PWbd प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही निशुल्क अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. या निकषांमध्ये शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेच्या संबंधित अर्ज एकंदरीत, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. किमान २० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असलेले उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये या अटी शर्ती नमूद आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या अटी शर्ती अगोदर पात्र कराव्या लागणार आहेत. नियमानुसार, उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया होणार असून प्रीलियम्स १०० गुणांचे असतील. एका तासाची ही परीक्षा असेल. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच या परीक्षेला उत्तीर्ण करत उमेदवारांना २०० गुणांच्या परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे. २ तास ४० मिनिटांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाईल. तसेच उमेदवारांची स्थानिक भाषेवरील पकड जाणून घेण्यासाठी त्यांची स्थानिक भाषेसंबंधित चाचणी घेण्यात येईल.

सर्वप्रथम bank.sbi/web/careers या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
“ज्युनियर असोसिएट्सची भर्ती 2024” वर क्लिक करा.
वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
अचूक तपशीलांसह अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

हेही वाचा :

गाडी घ्यायचा करताय प्लॅन? Numerology नुसार कशी असावी नंबर प्लेट

गाडी घ्यायचा करताय प्लॅन? Numerology नुसार कशी असावी नंबर प्लेट

चष्म्यामध्ये लावला होता कॅमेरा, गुपचूप काढत होता राम मंदिराचे फोटो