पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

सीमा हैदर पाकिस्तानहून भारतात आलेली महिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने पाकिस्तानहून भारतात येऊन सचिन नावाच्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी आली होती. ती सोशल मीडियावर ती सतत सक्रिय असते. नुकतेच सीमाने एक व्हिडिओ(video) शेअर केला असून तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीमा लवकरच पाचव्या मुलाची आई होणार असल्याचे तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तिच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सीमाने व्हिडिओमध्ये सांगितले आहे ती, सध्या तिला नववा महिना सुरु असून लकरच मार्च महिन्यात तिची डिलिव्हरी होणार आहे. या आनंदाच्या क्षणी तिच्या कुटुंबीयांनी ग्रेटर नोएडा येथे रबूपुरा येथे तिच्या बेबी शॉवरटा कार्यक्रम आयोजित केला होता. तिला आधीपासूनच चार मुले असून, आता ती पाचव्या मुलाची आई होणार आहे. मात्र तिच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पहिल्यांदाच केला असल्याचे तिने सांगतिले. ती अतिशय आनंदी दिसत आहे आणि तिने सांगितले ती डान्स करणार आहे. सध्या तिच्या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ(video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची पबजी गेममुळे प्रमेकहाणी सुरु झाली होती. पेबजी खेळताना त्यांच्यात मैत्री झाली आणि हळहळू ती प्रेमात बदलली. सीमाने आपल्या प्रेमासाठी मोठा निर्णय घेतला आणि पाकिस्तानमधून नेपाळमार्गे भारतात आली. नंतर दोघांनी लग्न केले. आता ती ग्रेटर नोएडामध्ये सचिनसोबत राहते. दोघांचीही प्रेमकहाणी चांगलीच चर्चेत आली. काही लोकांनी याला समर्थन दिले तर काही विरोध केला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सीमा हैदरच्या या व्हिडिओला लोकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. एका युजरने सीमा जी, तुम्ही आनंदी रहा, हेच आमचे भारत देश आहे, जो सर्वांना प्रेम आणि सन्मान देतो. दुसऱ्या एकाने आम्हालाही बोलवा, तुमच्याजवळच राहतो असे म्हटले आहे. काहींनी जे पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाले नाही, ते भारतात पाहायला मिळाले. सध्या सीमा हैदरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सीमाने या @seema____sachin10 अकाऊंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत सम-विषम पार्किंगबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन

तुम्हालाही अन्न पचवण्यास त्रास होतो का करा ही योगासनं औषधांशिवाय मिळवा आराम

डोक्यावर कर्जाचा डोंगर, उसनवारीच्या पैशांचा तगादा, बायको अन् पोटच्या लेकानं केली बापाची हत्या; सांगली हादरलं