शाहरुख खानने सर्वांना मारली मिठी, पण हिजाबमधील तरुणीला पाहिल्यानंतर… video

अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.(video) प्रत्येक पिढीतील व्यक्ती आज शाहरुख खान याची चाहती आहे. फक्त भारतातच नाहीतर, जगातील प्रत्येक कोपऱ्यात किंग खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये कायम शाहरुख खान याची चर्चा रंगलेली असते. आता देखील किंग खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ जुना आहे. पण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात शाहरुख खानबद्दल असलेलं प्रेम आणखी वाढलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खानचा एक(video) थ्रोबॅक व्हिडिओ इंस्टाग्रामवर incredible.srk नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या काही चाहत्यांना भेटताना दिसत आहे. प्रत्येकाला किंग खान प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. पण हिजाबमध्ये असलेल्या तरुणीला पाहाताच अभिनेता खाली वाकतो आणि आदाब करतो. अभिनेता महिलेचा आणि संस्कृतीचा आदर करताना दिसत आहे.

शाहरुख खान याने आदाब केल्यानंतर तरुणी देखील मान खाली करत अभिनेत्याला सलाम करते… व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर शाहरुख खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आसतात. पण या व्हिडीओने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

सांगायचं झालं तर, व्हिडीओ आतापर्यंत 32 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘… म्हणून तो शाहरुख खान आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘महिलांचा आदर कसा करावा हे शाहरुख खान याच्याकडून शिकायला हवं…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘शाहरुख खान ऑट टाईम बेस्ट आहे….’ सोशल मीडियावर सध्या किंग खान याची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘किंग’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘किंग’ सिनेमात शाहरुख खान लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची देखील माहिती मिळत आहे.

किंग याने गेल्या वर्षी देखील हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची गर्दी जमली. तिन्ही सिनेमांनी फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील नवीन विक्रम रचले. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

शाहरुख खान चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या सर्वत्र प्रश्नांची उत्तरं देत असतो. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

हेही वाचा :

खरं कोण बोलतंय? फडणवीस की ठाकरे?

मायक्रोसॉफ्ट वापरकर्ते सतर्क राहा! सरकारने दिलाय ‘या’ असुरक्षेचा इशारा