शरद पवारच आता म्हणताहेत “महायुती”चं दुकान चालत नाही!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित म्हणजे आठ जागांवर(political) विजय मिळवल्यानंतर शरद पवार यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि तो स्वाभाविकही आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी सध्या वाढू लागली आहे. गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास आलेल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले चार महिने थांबा, सगळे प्रश्न सुटतील, मला इथले सरकार बदलायचे आहे.

तर काटेवाडी या त्यांच्या मूळ गावात बुधवारी झालेल्या सभेत बोलताना(political) ते म्हणाले, सरकार कसे पाडायचे ते मी बघतो. आता “महायुती”चे दुकान चालत नाही. सरकार पाडण्याचा, आणि दुकान बंद करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे.(वसंत दादा यांच त्यामुळे त्यांच्या सरकार) त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. फक्त त्यांनी सरकार बदलल्यावर सामान्य जनतेचे सर्व प्रश्न सुटतील याची गॅरंटी (मोदी गॅरंटी नव्हे) द्यायला हवी.

लोकसभा निवडणुकीत आठ मतदारसंघात तुतारीचा आवाज जोरदार वाजल्यानंतर शरद पवार सध्या खूप खुशीत आहेत. कारण त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे हे त्यांना मिळालेले अनपेक्षित यश आहे. त्यांच्याकडे त्यांचे हक्काचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह नव्हते. जवळचे असे विश्वासातले नेहमीचे सहकारी नव्हते. शरद पवार नावाचा आश्वासन चेहरा घेऊन ते नव्या दमाने लोकांच्या समोर गेले. आणि त्यांना यश मिळाले. आता त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पाडायचे आहे आणि महाविकास आघाडीचे पुन्हा सरकार आणावयाचे आहे. चार महिने थांबा, सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. सरकार बदलणार आहे असे ते म्हणू लागले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसला एक जागा मिळाली होती आणि विधानसभेच्या 19 मतदार संघात आघाडी मिळाली होती. तर अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या आणि विधानसभेच्या सदतीस मतदार संघात आघाडी मिळाली होती. या अंदाजाप्रमाणे दोन्ही काँग्रेसला मिळून 50 ते 60 जागा मिळणे अपेक्षित होते.
प्रत्यक्षात राष्ट्रीय काँग्रेसला 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. हे यश त्यांना मिळाले नसते तर महाविकास आघाडी अस्तित्वात आली नसती आणि शिवसेना ही अविभाजित राहिली असती.

महाराष्ट्रातील राजकारणाचे संदर्भ बदलले नसते. याचा अर्थ असा की लोकसभेच्या विजयाचे निकष विधानसभेला लावता येत नाहीत. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला हे माहीत नाही असे म्हणता येत नाही. पण कार्यकर्त्यांच्या पंखातील बळ वाढवण्यासाठी त्यांना हे बोलावे लागत आहे असे दिसते. लोकसभेतील महाविकास आघाडीच्या मोठ्या यशाने घटक पक्षातील सर्वच नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. पण सरकार बदलल्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील हा त्यांनी व्यक्त केलेला विश्वास हा भाबडेपणाचा आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेकदा सरकारी बदलली पण सामान्य माणसाची जगण्याची लढाई थांबली नाही हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.

पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार होते आणि दहा वर्षांपैकी बरीच वर्षे ते कृषी मंत्री होते. त्याच्या आधीही ते पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात होते. कृषी मंत्री म्हणून त्यांना बराच काळ मिळाला होता. पण शेतकऱ्यांचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तेव्हाही झाल्या आणि आजही होताना दिसतात. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषवले. तथापि महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न कालही होता(political) आणि आजही आहे. म्हणजेच सरकार बदलले की प्रश्न सुटतात असे म्हणता येणार नाही. उलट सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून काही नवे प्रश्न तयार केले जातात असे म्हणता येईल. त्यासाठी गेल्या चार वर्षात कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, तर कधी औरंगजेब तर कधी शाहू फुले आंबेडकर यांना स्वतःच्या राजकारणासाठी कारण नसताना”विषय”बनवले जाते. त्यातून निर्माण झालेले प्रश्न महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेले आहेत.

सध्याच्या महायुतीच्या सरकारला त्यांनी दुकान असे संबोधले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या दुकानाकडे मतदार फारसे फिरकले नाहीत असे त्यांना म्हणावयाचे असेल. तथापि लोकशाही च्या मार्गाने सत्तेवर आलेल्या आणि न्यायपालिकेने शिक्कामोर्तब केलेल्या महायुतीच्या सरकारला ते दुकान या अर्थाने संबोधतात हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि प्रगल्भ नेत्याला शोभणारे आहे असे कोणी म्हणणार नाही.

हेही वाचा :

मुलं शाळेत अन् शिक्षक बदलीसाठी कोल्हापुरात

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना