हडपसरमधील मांजरी बुद्रुक परिसरात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका गटाने विरोधी गटातील( man)तरुणावर लोखंडी रॉड व लाकडाच्या दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सुदैवाने त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पुढील धोका टळला. ही घटना मांजरी बुद्रुक येथे रविवारी रात्री घडली आहे.

वकील ( man)अक्षय रामदास घुले ( वय २८ रा. मांजरी बुद्रुक) असे गंभीर जखमीचे नाव आहे. समोरील गटातील आनंद घुले, आकाश घुले, कुणाल घुले, आशिष घुले, कृष्णा बेल्हेकर, पुष्पा घुले, रुक्मिणी घुले, ऋषी भोसले, गोकुळ घुले व त्यांची पत्नी, बाळासाहेब सिताराम घुले व त्यांची आई आणि त्यांचे २५ सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जखमीचे भाऊ महेश घुले ( वय ३७ रा. मांजरी ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन्ही गटात वाद आहेत. मांजरी येथील हे सर्व रहिवासी आहेत. पूर्वीपासून त्यांचा जमिनीचा वाद आहे. दोन दिवसांपूर्वी ही त्यांचा शाब्दिक वाद झाला होता.
रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांचा वाद झाला. यात तक्रारदार महेश घुले यांचा भाऊ वकील अक्षय घुले यांना लोखंडी रॉड व लाकडाने आरोपीने गंभीर मारहाण केली. यामध्ये अक्षय घुले गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली.
एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
हेही वाचा :
WhatsApp चॅट डिलीट झाला? या टिप्सने करा सोप्या पद्धतीने रिकव्हर!
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नक्की चाललंय तरी काय; NIT भ्रष्ट्राचाराविरोधात काँग्रेस आक्रमक
‘1 एप्रिलपासून…’ मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी मोठा निर्णय