गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या लग्नाची(shub mangal) चर्चा रंगली आहे. तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बोसोबत गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे म्हटलं जात होतं. पण तिच्या लग्नाचा एकही व्हिडीओ किंवा फोटो समोर आला नव्हता. त्यामुळे तिने खरंच लग्न केलं की लग्नाची अफवा होती, याबद्दल शंका वर्तवली जात होती. अखेर आता तापसीच्या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती नववधूप्रमाणे नटल्याचे दिसत आहे.
तापसी पन्नूने मॅथियस बोसोबत उदयपूरमध्ये लग्नगाठ(shub mangal) बांधली. त्यांच्या लग्नाचा शाही थाट यावेळी पाहायला मिळत आहे. तापसी आणि मॅथियसच्या लग्नाला जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय उपस्थित होते. या व्हिडीओत तापसीची मंडपात होणारी एंट्री पाहायला मिळत आहे. यात तापसीने लाल रंगाचा पारंपरिक पंजाबी सूट परिधान केला आहे. त्यासोबतच तिने हातात लाल रंगाचा चुडा, डोळ्यावर सनग्लासेस, लांबलचक वेणी असा लूक केल्याचे दिसत आहे. यावेळी तापसी ही हातात कलिरे घेत नाचत नाचतच मंडपात एंट्री घेताना दिसत आहे.
तर मॅथियसनेही लग्नासाठी पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. त्याने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी तापसी स्टेजवर येताच मॅथियस तिला हात देतो आणि ते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. यानंतर मग ते दोघेही स्टेजवर जाऊन एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे. यावेळी या जोडप्यावर उपस्थित लोकांनी फुलांची उधळण केली. तापसीच्या लग्नातील हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/04/image-94.png)
तापसीच्या लग्नातील हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. पण अद्याप तापसीने लग्नाचा एकही फोटो किंवा व्हिडीओ अद्याप शेअर केलेला नाही.
दरम्यान तापसी ही माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बो सोबत जवळपास दहा वर्षांपासून रिलेशनशिप आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. तापसी आणि मॅथियसचा लग्नसोहळा 23 मार्च रोजी पार पडल्याचे बोललं जात आहे. तापसी ही लवकरच ‘वो लडकी है कहा’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तापसी पन्नू अभिनेता प्रतिक गांधीसोबत झळकणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला
नवनीत राणांची उमेदवारी धोक्यात?, सुप्रीम कोर्ट जात वैधता प्रमाणपत्रावर देणार निकाल
उद्धव ठाकरेंना मारलेला ‘तो’ टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी