मुंबई: मुंबईतील एका लग्नसोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(politics) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील काही महिन्यांत तिसऱ्यांदा ठाकरे बंधू एका कार्यक्रमात एकत्र दिसले असून, त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य युतीबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

या लग्न सोहळ्यात ठाकरे(politics) बंधूंनी काही वेळ एकत्र घालवला आणि चर्चाही केली. यावेळी घेतलेले त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. मात्र, या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या विषयावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणताही अधिकृत संकेत दिलेला नाही. मात्र, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, “जर राज ठाकरे यांनी भूमिका बदलली, तरच एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो.” तसेच, मनसेकडूनही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधू खरोखरच एकत्र येतील का, की ही केवळ तात्पुरती चर्चा ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रामध्ये दिवसा उन्हाचा तडाखा, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
कोल्हापूरात अकरा तोळे सोन्यासाठी वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून केली हत्या
आनंदात नाचले अन्.. स्टेजवरच कोसळले, क्षणात वातावरण शोकात बुडाले, धक्कादायक व्हिडिओ समोर