सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक वेगवगेळ्या गोष्टी शेअर केल्या (acting)जातात. इथे बऱ्याचदा काही अशा घटना शेअर केल्या जातात ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नसावी. आजकाल रिल्सचे व्यसन फार पाहायला मिळते. कोणतीही घटना घडली की लोक लगेच आपला मोबाईल फोन काढून त्याची रील बनवू लागतात. त्यातही हे व्यसन आता मोठ्यांपर्यंत मर्यादित राहिले नसून आता ते लहान मुलांपर्यंत पसरले आहे जिथे आता चिमुकलेही या रिल्सवर नकोनको ते प्रकार करताना दिसतात. ते कधी कोणत्या फेमस गाण्यावर डान्स करतात तर कधी चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसतात मात्र सध्याच्या या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक कृत्य दिसून आले जे पाहून सर्वच हादरले.

नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकला गंभीर परिस्थितीतही स्टाईल मारताना दिसून आला. खरंतर या चिमुकल्यासोबत गंभीर अपघात घडून आला मात्र याबाबत त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती उलटे परिस्थितीचे भान न ठेवता तो पुष्पा स्टाईलमध्ये रील तयार करताना दिसून आला. त्याचे रक्तबंबाळ शरीर अपघाताच्या गंभीरतेचा इशारा देते. या सर्व प्रकारचा व्हिडिओ (acting)आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लहानग्यांमधील हे रीलचे वेड पाहून आता अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी कारचा भीषण अपघात घडून आल्याचे समजते. यात एक लहान मुलगा जखमी झाल्याचेही दिसून येत आहे. यावेळी आपल्याला मुलाच्या कपड्यांवर आणि शरीरावर काही रक्ताचे डाग देखील दिसून येतील. मात्र इतका मोठा अपघात होऊनही मुलगा घाबरून न जाता पुष्पा स्टाईलमध्ये रील बनवत राहतो. अपघात झाला, पण या लहानग्याचं रीलचं वेड काही सुटलं नाही जे पाहून अनेकजण थक्क झाले.
चिमुकल्याचा हा व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम(acting) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अपघातात जखमी झालेले बाळांनी मारली पुष्पा स्टाईल’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “झुकून उठल्याबद्दल अभिनंदन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाळा पहिले हॉस्पिटलमध्ये जा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सालटी गेली तरी चालेल, रुतबा कमी झाला नाही पाहिजे”.
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत