तुमचं ब्रेकअप झालं असेल किंवा तुमचं भांडण झालं असेल आणि तुम्ही दु:खी असाल तर तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन तुम्हाला सॅड रिल्स दाखवतो. म्हणजेच तुम्ही कोणत्या गोष्टींविषयी बोलत आहात, हे सर्व तुमचा स्मार्टफोन ऐकत आहे.भिंतीलाही कान असतात, ही म्हण तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनलाही कान असतात. होय, हे खरं आहे. तुम्ही बोलत असलेल्या सर्व गोष्टी तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन (smartphone)ऐकत असतो.

तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसला असेल, पण प्रत्येक स्मार्टफोन युजरने नक्कीच याचा अनुभव घेतला असेल. तुम्ही तुमच्या कुटूंबियांशी, मित्र – मैत्रिणींसोबत जे काही बोलत आहात त्या सर्व गोष्टी तुमचा स्मार्टफोन(smartphone) ऐकत आहे.तुम्ही तुमच्या मित्र – मैत्रिणींसोबत शॉपिंग करण्याविषयी बोलत असाल आणि त्यानंतर जेव्हा काही वेळाने तुम्ही तुमचा स्मार्टफोन ओपन करून एखादे अॅप उघडता तर त्या ठिकाणी तुम्हाला सेल आणि ऑफर्ससंबंधित अनेक जाहिराती पाहायला मिळतात.
अशी एक घटना देखील समोर आली होती, जेव्हा एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर नवीन बूट खरेदी करण्याविषयी बोलत होती. जेव्हा त्या मुलीने फोन ठेवला आणि इंस्टाग्राम ओपन केला तेव्हा तिला तिथे बूटांसंबंधित अनेक जाहिराती आणि पोस्ट दिसू लागल्या होत्या. अशा घटना आपल्यासोबच देखील अनेकवेळा घडतात.

याचा अर्थ असा आहे की, तुमचा अँड्रॉईड स्मार्टफोन(smartphone) तुमच्या सर्व गोष्टी ऐकत आहे. जर तुम्हीही गूगल असिसटेंट चा वापर करत असाल तर तुमचा स्मार्टफोन तुमच्या सर्व गोष्टी ऐकत आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनने तुमचं बोलणं ऐकू नये तर तुम्ही एक छोटी सेटिंग करून या समस्येपासून मुक्ति मिळवू शकता.
तुम्हाला माहित आहे का की जवळजवळ सर्व व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड टेक्नोलॉजी फोनच्या मायक्रोफोनचा वापर करतात. तुमच्या आदेशानुसार फोनने लगेच काम करावे यासाठी, तुमचा फोन त्याचे व्हर्च्युअल इअर एक्टिव ठेवणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की तुमचा अँड्रॉइड फोन तुमचे नेहमीच ऐकू शकतो.
जर तुम्ही गुगल असिस्टंट वापरत असाल तर फोन तुम्ही जे काही बोलता ते ऐकत असतो. अँड्रॉइड फोन तुमचे संभाषण ऐकू नये म्हणून विशेष गुगल असिस्टंट सेवा बंद करण्याची सुविधा देखील आहे.
गुगल असिस्टंट सेवा डिसेबल करण्यासाठी, तुम्हाला प्रथम सेटिंग्ज मेनू ओपन करावा लागेल आणि गुगलवर जावे लागेल.आता खाली स्क्रोल करा आणि “Settings for Google apps” वर क्लिक करा.आता तुम्हाला Search, Assistant & Voice वर टॅप करावे लागेल.येथे तुम्हाला Google Assistant वर टॅप करावे लागेल.आता तुम्हाला “Hey Google” वरील टॉगल बंद करावा लागेल.यासोबतच, तुम्ही Remove Voice Match या पर्यायावर देखील जाऊ शकता.
हेही वाचा :
वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत
चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, ‘या माध्यमातून धनश्रीची…’
पाकिस्तानपेक्षा चांगल तर…’ भारत पाक सामन्यापूर्वी इरफान पठाणने केलेल्या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ