राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा(political)निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचं वारंवार बोललं जात आहे. अशातच आता यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा(political) निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने त्याच खापर एकमेकांवर फोडलं जातंय. मात्र आता अवघ्या काही महिन्यांनी राज्यात महानगरपालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी फुटू शकते अशा चर्चा रंगल्या आहे.
मात्र यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी राऊतांनी ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
याप्रकरणी संजय राऊत म्हणाले, “मुंबई, पुणे, ठाण्यासह नागपूरपर्यंत आम्ही महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू, निवडणुकीत आमचं काय होईल, हे आम्हाला देखील एकदा आजमावायचं आहे”, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.
तसेच महाविकास आघाडीमध्ये काम करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. मात्र याचा फटका पक्षाच्या वाढीला नक्कीच बसला आहे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, तसेच आपापले पक्ष मजबूत करणार आहोत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा :
करण जोहर-सिद्धार्थ मल्होत्राचा मुंबईत रॅम्पवॉकवर जलवा
अभिजित पटवा यांची लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड
मकर संक्रांतीच्या आधी सूर्यदेव चमकवणार ‘या’ राशींचे नशीब; धनाचा होणार वर्षाव