IPL 2023 च्या आधी 5 भारतीय गोलंदाजांवर बंदी

IPL च्या लिलावाआधी आलेल्या या बातमीमुळे सर्वच फ्रँचाइझींची(franchises) चिंता वाढली आहे. आज सगळ्या आयपीएल प्रेमींच्या नजरा आहेत त्या फक्त आयपीएलच्या लिलावावर. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावासाठी सर्व 10 फ्रँचायझी सज्ज झाल्या आहेत. आज कोचीमध्ये 405 खेळाडूंवर बोली लावण्यात येणारे.

या लिलावात सर्व संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र त्याआधी आयपीएलचा (franchises)सर्वात यशस्वी संघ आणि 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा एक फिरकीपटू यावर बंदी घालण्याचा धोका आहे. अशा 5 भारतीय गोलंदाजांवर बंदीचा धोका आहे.

खरं तर, भारतीय क्रिकेट बोर्डाने सर्व फ्रँचायझींना एक मेल पाठवून आयपीएल 2023 साठी उपलब्ध खेळाडूंची माहिती दिली होती. बीसीसीआयच्या या मेलमध्ये ज्या 5 भारतीय बॉलर्सवर बॅन होऊ शकते, त्यांची नावंही नमूद करण्यात आली होती.

Mumbai Indians ला पण धोका!
मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज तनुष कोटियन हा संशयास्पद ॲक्शन असलेल्या खेळाडूंच्या यादीत असल्याचे बोर्डाने फ्रँचायजींना सांगितले. नुकत्याच झालेल्या हैदराबादविरुद्धच्या रणजी लढतीत ऑफ स्पिनर तनुषने मुंबईला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. हैदराबादविरुद्ध तनुषने दोन्ही डावात 7 विकेट्स घेत मुंबईला एक डाव आणि 217 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. याआधी आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 63 धावांची खेळी करत एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी तनुषही अप्रतिम फॉर्ममध्ये आहे पण तो संशयास्पद ॲक्शन असलेल्या खेळाडूंच्या यादीत आहे.

आणखी 4 खेळाडू
क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयने लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींना मेलद्वारे सांगितले की, मुंबईचा फिरकीपटू तनुष, केरळचा रोहन, विदर्भाचा अपूर्व वानखेडे, गुजरातचा चिराग गांधी आणि महाराष्ट्राचा रामकृष्णन घोष या खेळाडूंचा संशयास्पद कारवाई होणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश असून त्यांच्यावरही बंदी घातली जाऊ शकते.

संशयास्पद ॲक्शनमुळे याआधीही अनेक खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकचा मनीष पांडे, एमसीएचा अरमान जाफर, बंगालचा चटर्जी आणि महाराष्ट्राचा अझीम काझी यांच्यावर याआधीच गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा :