टीम इंडियासाठी खुशखबर, ताफ्यात लवकरच दाखल होणार हा खेळाडू!

भारतीय क्रिकेट संघासाठी (team india) एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार सलामीवीर केएल राहुल फिट होत आहे. राहुल आगामी दौऱ्यांमध्ये खेळू शकणार नाही, पण केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेपूर्वी कर्णधार राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यानंतर त्याची प्रकृती पाहता राहुल आगामी काही सामने खेळू शकणार नसल्याची माहिती वैद्यकीय पथकाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला दिली. तसेच तो, निर्धारित पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडलाही जाऊ शकणार नाही. असे सांगण्यात आले. दरम्यान, के एल राहुल फिट होत असल्याची माहिती समोर आली आहे.
राहुलने नुकतंच कू अॅपवर काही फोटो शेअर करत ‘माझ्यासाठी प्रार्थना करत राहा’ असे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याने रिकव्हरीकडे त्याचे लक्ष केंद्रीत केले आहे.(team india)
बर्मिंगहॅममध्ये 1 जुलैला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 2-1 ने पुढे आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय संघ कसोटी मालिका मध्येच सोडून भारतात परतला होता. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्याव्यतिरिक्त 3 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
असा असणार भारताचा संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
हेही वाचा :