हार्दिक पांड्याला लागणार कर्णधारपदाची लॉटरी! रोहित-विराटसह बड्या खेळाडूंना मिळणार विश्रांती

T-20

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल व्यतिरिक्त, पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20(T-20) मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

या दोघांशिवाय ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनाही ब्रेक दिला जाऊ शकतो. जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, अनुभवी फलंदाज शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यापैकी एकाकडे दक्षिण आफ्रिकेसोबत आयर्लंडविरुद्धच्या 2 टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. आयपीएल 2022 मध्ये पांड्याने आपल्या कर्णधारपदाने सर्वांना प्रभावित केले आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून टी-20 मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20(T-20) मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीत खेळवला जाणार आहे. तर उर्वरित सामने कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड 22 मे रोजी मुंबईत IPL 2022 च्या लीग स्टेजच्या शेवटच्या दिवशी होणार आहे.

खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात येणार असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आधीच सांगितले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला होणारा इंग्लंड दौरा निवड समितीसाठी तसेच बीसीसीआयसाठी खूप महत्त्वाचा आहे. वरिष्ठ खेळाडूंना तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात येणार या प्रकरणाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “भारताच्या सर्व अनुभवी खेळाडूंना किमान साडेतीन आठवडे पूर्ण विश्रांती मिळेल. रोहित, विराट, राहुल, ऋषभ आणि जसप्रीत हे सर्व मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर ‘पाचव्या कसोटी’साठी थेट इंग्लंडला रवाना होतील.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आम्हाला आमच्या सर्व प्रमुख खेळाडूंना ताजे ठेवण्याची गरज आहे. अंबाती रायडूने अचानक IPL मधून निवृत्ती होण्याचं ट्विट का केलं? CSK ने उलगडलं रहस्य पांड्या किंवा धवन यांच्यापैकी एकाला कर्णधारपद मिळू शकते संघाच्या कर्णधारपदाबाबत विचारले असता सूत्राने सांगितले की, निवडकर्त्यांकडे दोन पर्याय आहेत. पहिला, विराट, रोहित आणि राहुल यांच्या अनुपस्थितीत गेल्या वर्षीच्या श्रीलंका मालिकेत भारताचे नेतृत्व करणारा शिखर धवन.

यासोबतच हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्ससाठी आपल्या कर्णधारपदाने खूप प्रभावित केले आहे. परिणामी आता कर्णधारपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. उमरान मलिकला आत्ता संधी मिळणार नाही उमरान मलिकने 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, तो राष्ट्रीय संघाच्या जबाबदारीसाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे.

शेवटच्या षटकांचा स्पेशालिस्ट अर्शदीप सिंगसह लखनऊ सुपर जायंट्सचा डावखुरा गोलंदाज मोहसिन खानला संघात संधी मिळू शकते. असे समजते की, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20(T-20) मालिकेत खेळलेले बहुतेक खेळाडू आयपीएलमधील सध्याच्या फॉर्मकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय संघात कायम ठेवणार आहेत. हा भारताचा डेथ ओव्हर्सचा सर्वोत्तम गोलंदाज, RCB च्या बॉलरचं सचिनकडून कौतुक सूर्यकुमार आणि जडेजा जखमी सूर्यकुमार यादव किंवा रवींद्र जडेजा यांच्या दुखापती लक्षात घ्याव्या लागतील. दीपक चहरही उपलब्ध होणार नाहीत.

ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा यांच्यासह धवन आणि हार्दिक हे फलंदाज फलंदाजीतील प्रमुख खेळाडू असतील. संजू सॅमसनलाही कायम ठेवता येईल. तर वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, हर्षल पटेल, आवेश खान हे जवळपास निश्चित आहेत. फिरकी गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या उत्कृष्ट जोडीशिवाय कुलदीप यादवही संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे.

Smart News:-

आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला


कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर


‘वाय’ नक्की आहे तरी काय?


IPL सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचा थेट पाकिस्तानशी संबंध! CBI तपासात 3 जणांना अटक


Leave a Reply

Your email address will not be published.