चहरला मिळालं नाही संघात स्थान, चाहते म्हणाले- T20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर का?

Indian team

Deepak Chahar : भारतीय संघ (Indian team) सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. लखनौमध्ये मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. यामध्ये कर्णधार शिखर धवनने मोठा बदल केला आहे. धवनने वेगवान गोलंदाज दीपक चहरला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिलेले नाही. चहरला दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात (Indian team) स्टँडबाय खेळाडू म्हणून जाणार आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी दीपकला संधी मिळू शकते असेही मानले जात आहे.

धवनने दीपकला प्लेइंग-11 मधून वगळले त्यावरून बुमराहच्या जागी संघ व्यवस्थापनाच्या प्लॅनमध्ये दीपकचे नाव नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच बीसीसीआयच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना हाच प्रश्न विचारला आहे. बीसीसीआयने पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी शेअर केलेल्या प्लेइंग-11वर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले, ‘दीपक चहर भाऊ कुठे आहे? विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला पाहत नसल्याचे निश्चितपणे दिसत आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटले की, ‘दीपक चहरने टी-20 मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करूनही पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का मिळाली नाही?’

Smart News:-