बलात्काराचे आरोप आणि बरंच काही…! प्रसिद्ध अंपायरवर आली शूज विकण्याची वेळ

पाकिस्तानचे असद रौफ हे फार प्रसिद्ध (cricket umpire) अंपायर राहिलेत. वर्ल्ड कपमध्येही ते अंपायरिंग करताना दिसलेत. मुंबईतील एका मॉडेलसोबतचा त्याचा फोटो व्हायरल झाल्याने भारतात त्यांची फार चर्चा केली गेली. मात्र हे माजी अंपायरने क्रिकेटच्या मैदानापासून पूर्णपणे दुरावलेत. आजकाल ते लाहोरच्या एका परिसरात बूट विकण्याचं काम करतात.

पाकिस्तान सध्या वाईट परिस्थितीतून जातोय. इम्रान सरकार पाडल्यानंतर जनतेला महागाईचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर त्याचा परिणाम खेळाडूंवरही दिसून येतोय. काही दिवसांपूर्वी मोहम्मद हाफिजने पाकिस्तानात पेट्रोल मिळत नसल्याबद्दल ट्विट करून सरकारच्या नव्या पाकिस्तानचा पर्दाफाश केला होता.

अशातच आता प्रसिद्ध अंपायर (cricket umpire) असद रौफ यांचा शूज विकतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका पत्रकाराने त्यांना विचारलं की, तुम्ही या कामावर खूश आहात का, असद रौफ यांनी पत्रकाराला उत्तर देताना सांगितलं,

मी जे काही काम करतो, “त्या कामाचं शिखर गाठतो. जे काम मी सोडलं, ते मा सोडूनंच दिलं. मी आता एकही क्रिकेट सामना पाहत नाही. जेव्हा संपूर्ण आयुष्यभर मी क्रिकेटचं पाहिलंय, मग आता टीवीवर काय बघायचं.”

ते पुढे म्हणाले, “मी नुकताच माझा स्वतःचा छोटा बूट आणि कपड्यांचा व्यवसाय सुरू केलाय. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे. हेही माझ्या रक्तातच आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काम करत राहीन. मी 66 वर्षांचा आहे आणि माझ्या पायावर उभा आहे”

Asad Rauf यांच्यावर होते बलात्काराचे आरोप
असद रौफ यांच्यावर 2012 साली मुंबईतील एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. मॉडेलच्या म्हणण्याप्रमाणे, ती आणि असद रौफ दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. लग्नाचं आश्वासन देऊन रौफ यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर माघार घेतली. दरम्यान रौफ यांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले.

हेही वाचा :


शिवाजी विद्यापीठ स्तरावरील सर्व लेखी परीक्षा स्थगित!

Leave a Reply

Your email address will not be published.