धक्कादायक! पबबाहेर क्रिकेटरला जबर मारहाण, मृत्यूशी देतोय झुंज!

एखाद्या संघाने एखादा मोठा सामना जिंकला अथवा मालिका जिंकली की प्रत्येक संघ किंवा खेळाडू सेलिब्रेशन करत असतात. मात्र असे सेलिब्रेशन (pub) करणे एका खेळाडूला चांगलेच महागात पडलेय.

कारण या खेळाडूला सेलिब्रेशन करताना तुफान मारहाण झाल्याची घटना घडलीय. ही मारहाण इतकी भयानक होती हा खेळाडू आता हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढतोय.

दक्षिण आफ्रिकेचा माजी अंडर-19 गोलंदाज मोंडली खुमालो याच्यासोबत मारहाणीची घटना घडली आहे. खुमालो सध्या नॉर्थ पेथर्टन क्रिकेट क्लबसोबत त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर इंग्लंडला होता. यावेळी संघातील खेळाडूंसोबत सॉमरसेटच्या ब्रिजवॉटर शहरातील एका पबमध्ये (pub) हे खेळाडू विजयाचे सेलिब्रेशन करत होते. यावेळी पबच्या बाहेर मारहाणीची घटना घडली. या मारहाणीत खुमालो गंभीर जखमी झाला होता. ही मारहाण इतकी गंभीर होती की त्याच्या मेंदूतून खूप रक्तस्त्राव झाला होता. सध्या त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

एका खास रिपोर्टनुसार खुमालोच्या मेंदूतून खुप जास्त रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी औषधांच्या मदतीने त्याला तात्पुरत कोमात पाठवलेय. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये तो जीवन-मरणाची लढाई लढतोय.

नॉर्थ पेथर्टन क्रिकेट क्लब संघ आणि खुमालोचा एजंट रॉब हम्फ्रीज यांनी सांगितले की, खुमालो खूप छान व्यक्ती आहे. नॉर्थ पेथर्टनमधील प्रत्येकजण त्याचा चाहता आहे. त्याच्या आईला विश्वासच बसत नव्हता की त्याच्यासोबत अशी घटना घडली आहे. सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली आणि तो क्लबमधला एक उत्कृष्ट खेळाडू आहे.

हेही वाचा :


झटका! Airtel, Jio आणि VI या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महागणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *