सोशल मीडियावर Mithali raj च्या फोटोंची धूम!

भारताची महान क्रिकेटपटू मिताली राज(mithali raj cricinfo)सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मिताली राज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात Active आहे. वेळो-वेळी मिताली राज आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. क्रिकेटशिवाय मिताली राज भरनाट्यम कलेमध्ये सुद्धा निपुण आहे.

तिचं हे प्रेम कुठे ना कुठे दिसून येतं
भारतीय कला आणि संस्कृतीबद्दल मितालीला आपुलकी आहे. तिचं हे प्रेम कुठे ना कुठे दिसून येतं. मिताली(mithali raj cricinfo) राजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे साडीमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. मिताली राज या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंना मिताली राजने खास कॅप्शन सुद्धा दिलं आहे.

साडीबद्दल मितालीला विशेष प्रेम
मिताली राजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेयर केले आहेत. त्यात ती इंडियन ट्रेडिशनल लुकमध्ये दिसते. एकवेळ मैदानात मिताली आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायची. भारताची ही महान महिला क्रिकेटपटू साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

गुटरगु साडीमध्ये दिसली मिताली
मितालीने जी साडी नेसलीय, तिला गुटरगू साडी म्हणतात. चिमणी सारख्या सुंदर रंगांमुळे कदाचित साडीला हे नाव दिलं गेलं असेल. एक्सेसरीजमध्ये मितालीने चोकर आणि रिंग्सही घातल्या आहेत. मितालीचा हेयरकट सुद्धा खूपच सुंदर दिसतोय. मेकअपबद्दल बोलायच झाल्यास तिने सटल मेकअपची निवड केलीय. मितालीच्या या पोस्टवर युजर्सनी भरपूर कमेंटस केल्या आहेत. काहींनी तिला खूप सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. काहींनी स्टनिंग लूक म्हटलय. काही दिवसांपूर्वी मितालीच्या जीवनावरील ‘शाबाश मिट्ठू’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तापसी पन्नूने या चित्रपटात मितालीची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :