MS Dhoni च्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ!

महेद्रसिंग धोनीला (dhoni) दोन वर्ष झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुण, पण आजही त्याची फॅन फॉलोइंग आहे तशी आहे. धोनी आजही लाईमटाईमपासून दुर आहे. धोनी स्वतः सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

क्रिकेट जगतात करिष्मा करणाऱ्या धोनीला (dhoni) टेनिसचीही खूप आवड आहे. धोनीचा टेनिस पार्टनर सुमित कुमार बजाजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.

टेनिस प्रशिक्षक सुरेंदर यांने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. धोनीने आपल्या उपस्थितीने या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आणखी खास बनले आहे. या बर्थडे सेलिब्रेशनदरम्यान धोनीने एका मुलीला कडेवर घेतले आहे. तिला तो केकही खाऊ घातला आहे. धोनीच्या या मुलीसोबतच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ही छायाचित्रे पाहून चाहते धोनीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. यानंतर धोनी सलग तीन आयपीएल हंगाम खेळला आहे, त्यापैकी त्याने एकदा संघाला चॅम्पियन देखील बनवले आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे.

हेही वाचा :


एकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर!

Leave a Reply

Your email address will not be published.