संघात निवड झाली नसल्याने क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, पाकमध्ये खळबळ!

पाकिस्तानच्या क्रीडा विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट (pakistan cricket) बोर्डाच्या आंतरशहर चॅम्पियनशिपसाठी संघात निवड झाली नसल्यानं एका खेळाडूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शोएब असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव आहे. सध्या शोएब रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तान (pakistan cricket) येथील दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील देशांतर्गत वेगवान गोलंदाज शोएबने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शोएबच्या कुटुंबातील एका सदस्याच्या माहितीनुसार , चॅम्पियनशिपच्या चाचण्यांनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. नैराश्यातून त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये बेशेद्ध अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याने स्वत:चे मनगट कापून घेतलेले दिसले. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शोएब बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडला होता. आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातील एका खासगी रूग्णालयाच शोएब यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :


जान्हवीच्या किलर पोझने नेटकऱ्यांना केलं घायाळ..! (Photos)

Leave a Reply

Your email address will not be published.