टीम इंडिया इतिहास घडवण्याजवळ, पाकिस्तानचा विक्रम मोडणार गब्बर’ची सेना!

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पहिली वनडे जिंकत सीरिजची सुरूवात चांगली केली आहे. तीन वनडे (highest score in odi) मॅचच्या सीरिजमध्ये भारताने पहिली मॅच 3 रनने जिंकली. आता दोन्ही टीममध्ये दुसरी मॅच रविवारी होणार आहे. सीरिजच्या सगळ्या मॅच पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये होत आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. एका टीमविरुद्ध लागोपाठ सर्वाधिक द्विपक्षीय वनडे सीरिज जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडिया करू शकते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (highest score in odi) विजय झाला तर टीम इंडिया सीरिजवरही कब्जा करेल. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा लागोपाठ 12 वा वनडे सीरिजचा विजय असेल. असं झालं तर भारत एका टीमविरुद्ध सर्वाधिक वनडे सीरिज जिंकण्याचं रेकॉर्ड आपल्या नावावर करेल. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात या रेकॉर्डची बरोबरी आहे.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ 11 द्विपक्षीय वनडे सीरिज जिंकल्या आहेत. मे 2006 साली भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचं पराभूत व्हावं लागलं होतं. यानंतर जानेवारी 2007 पासून भारताच्या वनडे सीरिज विजयाचा रथ अजूनही सुरूच आहे.

पाकिस्तानचं लागोपाठ 11 वनडे सीरिज जिंकण्याचा विक्रम कमजोर झिम्बाब्वेविरुद्ध आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात 14 वनडे सीरिज झाल्या, यातल्या एकाही सीरिजमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला नाही, पण पहिल्या तीन वनडे सीरिज ड्रॉ झाल्या, यानंतर पाकिस्तानने लागोपाठ 11 सीरिज जिंकल्या.

एका टीमविरुद्ध लागोपाठ वनडे सीरिज विजय

11 वेळा भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केलं (2007 पासून आतापर्यंत)

11 वेळा पाकिस्ताननने झिम्बाब्वेला हरवलं (1996 पासून आतापर्यंत)

10 वेळा पाकिस्तानने वेस्ट इंडिजला हरवलं (1996 पासून आतापर्यंत)

9 वेळा दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला हरवलं (1995 पासून आतापर्यंत)

9 वेळा भारताने श्रीलंकेला हरवलं (2007 पासून आतापर्यंत)

Smart News :


घरफोडीत तरबेज असलेल्या तीन अट्टल चोरट्यांना विटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Leave a Reply

Your email address will not be published.