Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की…

टीम इंडियाला 24 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना आणि त्यानंतर 1 जुलैपासून एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे. पण, त्याआधी विराट कोहली (virat kohli) बोर्ड आणि लोकांच्या इच्छांना धुडकावताना दिसतोय. सिरीज आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही टेस्ट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
विराट कोहली (virat kohli) आणि रोहित शर्मा हे दोघंही खेळाडू म्हणावेत तेवढे फॉर्ममध्ये नाही. शिवाय दोघांनीही गेल्या काही काळापासून लाल चेंडूचं क्रिकेट म्हणजेचं टेस्ट सामने खेळलेले नाहीत.
Virat Kohli च्या वागण्यात सुधारणाच नाही
नुकत्यात मिळालेल्या माहितीनुसार, मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुळात जरी त्याने कोरोनावर मात केली असली तरीही त्याच्या वागण्यात सुधारणा होताना दिसत नाही.
इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असता पुन्हा एकदा विराट विनामास्क कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी तो चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला तर काही चाहत्यांना त्याने ऑटोग्राफ दिला आहे.
दरम्यान यापूर्वीही रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले होते. संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या या कृतीमुळे बीसीसीआयने नाराजीही व्यक्त केली होती.
बायो बबल नसल्यामुळे खेळाडू सतत मनमानी करत असतात. अशा परिस्थितीत त्याचा कोरोना होण्याचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये दररोज 10,000 प्रकरणे नोंदवली जातायत. जर एखादा भारतीय खेळाडू या विषाणूच्या विळख्यात आला तर त्याचा परिणाम भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन टेस्टवर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :