कोण आहे उर्वशी? ज्याची इन्स्टा स्टोरी ठेवली त्यानेच ओळखण्यास दिला नकार

Urvashi Rautela

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्या रीलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.उर्वशी रौतेलाने नसीम शाह संबंधित एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. या रिलेशनशिपच्या चर्चेवर आता नसीम शाहने प्रतिक्रिया दिली आहे. या संबंधित व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

आशिया कपच्या पहिल्या सामन्यापासून उर्वशी रौतेलाची (Urvashi Rautela)  चर्चा सुरु आहे. टीम इंडियाचा बॅटसमन रिषभ पंत (Rishabh Pant) सोबत तिचे नाव गेल्या काही दिवसांपासुन जोडलं जात होत. दोघांमध्ये सोशल मीडियावर जोरदार भांडण देखील झालं होतं. त्यानंतर रिषभ पंत आणि उर्वशी रौतेलामध्ये बिनसल्याची चर्चा होती. आता आशिया कपमध्ये उर्वशी स्टेडियममध्ये दिसल्याने रिषभ पंतची (Rishabh Pant) चर्चा होती. मात्र टीम इंडियाच्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर ही चर्चा थांबली, आणि नवीन चर्चा सुरु झाली.

उर्वशीची इन्स्टाग्राम स्टोरी
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah)  आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच नाव जोडलं जात आहे. उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर नसीम शाहचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये नसीम मैदानात हसताना दिसत आहे, तर उर्वशी त्याच्याकडे पाहून लाजत असल्याचे दिसले. या व्हिडिओनंतर दोघांचं सोशल मी़डियावर नाव जोडलं गेलं होतं. उर्वशी रौतेलाच्या फॅन पेजने हा व्हिडिओ बनवला होता. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला होता.

या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर नसीम शाह (Naseem Shah) आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या आणि व्हिडिओ समोर येत आहेत. आता नसीमने स्वतः पुढे येऊन याप्रकरणी खुलासा केला आहे. नसीमने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की उर्वशी कोण आहे हे मला माहीत नाही.

नसीम शाह काय म्हणाला? 
उर्वशीच्या  (Urvashi Rautela)  प्रश्नावर नसीम शाह म्हणाला की, तुमच्या प्रश्नावर हसू येत आहे, कारण उर्वशी कोण आहे हे मला माहीत नाही. ती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करते, मला माहीत नाही. माझी अशी कोणतीही योजना नाही. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.

नसीम शाह (Naseem Shah)  पुढे म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर मला याबाबत काहीच माहिती नाही. मी माझा खेळ मैदानावर खेळतो. मला काही कल्पना नाही. जे मैदानात येऊन सामना बघतात, ही त्यांची मेहरबानी असते. जो कोणी मला आवडतो, ती चांगली गोष्ट आहे. मी काही आकाशातून आलो नाही आहे, माझ्यात विशेष काही नाही, पण लोक प्रेम करतात, त्यामुळे चांगली गोष्ट आहे,असे तो म्हणतोय.

एकंदरीत त्याने या चर्चेवर समीश्र प्रतिक्रिया दिली. तसेच त्याच्या वक्तव्यावरून त्या दोघांमध्ये कोणतचं नातं नसल्याचे समोर आले आहे.

 

Smart News:-