युझवेंद्र चहलचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, पत्नी सोबतचे प्रायव्हेट चॅट व्हायरल; पाहा फोटो

टीम इंडियाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल  सध्या विश्रांती घेत आहे. चहल वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियासोबत खेळत नाहीये. त्यातच आता युझवेंद्र चहलचं इन्स्टाग्राम अकाऊंट  हॅक (instagram support chat) झालं आहे. एवढच नाही चहलच्या प्रायव्हेट चॅटचे स्क्रीनशॉटही व्हायरल करण्यात आले आहेत.

युझवेंद्र चहलचं इन्स्टाग्राम अकाऊंट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याची आयपीएल  टीम राजस्थान रॉयल्सनेच  हॅक केलं. हे सगळं मस्करीमध्ये सुरू होतं. स्वत: राजस्थान रॉयल्सनेच आपण युझवेंद्र चहलचं अकाऊंट हॅक केल्याची माहिती दिली. यासोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला, ज्यात युझवेंद्र चहलच्या प्रायव्हेट चॅटचा (instagram support chat) स्क्रीनशॉट आहे. या फोटोला राजस्थान रॉयल्सने हिसाब चुकता, असं कॅप्शन दिलं आहे.

राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या प्रायव्हेट चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये चहलची पत्नी धनश्री वर्मा, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, एमएस धोनी, जॉस बटलर, भारतीय क्रिकेट टीम आणि रोहित शर्मा यांच्या अकाऊंटवरून आलेले मेसेज दिसत आहेत. तुम्ही पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये आलात? असा प्रश्न धनश्रीने चहलला विचारला. तर रोहित शर्माने चहलला अकाऊंट डिलीट करण्याचा सल्ला दिला. चहलच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयपीएल 2022 वेळी युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं होतं. तेव्हा चहलने राजस्थान रॉयल्सच्या अकाऊंटवरून स्वत:ला कर्णधार केल्याची घोषणा केली होती. यानंतर चाहत्यांनीही चहलला शुभेच्छा दिल्या, एवढच नाही तर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननेही त्याचं अभिनंदन केलं. काही वेळानंतर चहलने स्वत: घोषणा करत आपण टीमचं अकाऊंट हॅक केल्याचं सांगितलं होतं.

Smart News :


काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; प्रियांका गांधींना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले; व्हीडिओ समोर

Leave a Reply

Your email address will not be published.