कोल्हापूर : तर एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : दीर्घकाळानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी(st) एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ, नवीन बस खरेदी, महागाई भत्ता फरक, वाढीव घर भाडे भत्ता, आणि वैद्यकीय कॅशलेस विमा लाभ आदी मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे. संघटनांनी इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होईल.

गुणवंत सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी विलीणीकरणाच्या(st) मागणीसाठी सहा महिन्यांचे आंदोलन झाले होते. त्यावेळी विलीनीकरणाची मागणी शासनाने नाकारत वेतनवाढ दिली होती. परंतु, सदावर्ते यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवले होते, ज्यामुळे तत्कालीन संघटनांचा प्रभाव कमी झाला.

कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता रद्द झाली होती. पुढे सदावर्ते यांचे संचालक मंडळ एसटी बॅंकेवर निवडून आले, पण बॅंकेचा कारभार वादात सापडला. कर्मचारी कर्ज व ठेवींच्या रकमांबद्दल अडचणींमध्ये आले. या वादांमुळे एसटी कर्मचारी नाराज झाले आणि संघटनांच्या छायेत परत आले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या ९ संघटनांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास लाखो प्रवाशांच्या प्रवासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा राज्यभरातील सेवा प्रभावित होऊ शकते.

आंदोलनातील मागण्या
पाच हजार रुपये सरसकट वेतनवाढ

स्वतःच्या नवीन बस खरेदी करा

कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक द्यावा

वाढीव घर भाडे भत्ता, वेतन वाढीचा फरक द्या

वैद्यकीय कॅशलेस विमा लाभ द्यावा

जाचक शिस्त आवेदन कार्यपद्धत रद्द करावी

हेही वाचा :

आलिया भट्ट पहिल्यांदाच दिसणार अनोख्या अवतरात

मोठी बातमी : दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांची चौकशी

हार्दिक नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर पूर्णविराम! पांड्या या रशियन मॉडेलला करतोय डेट