राज्यातील एसटी प्रवास(ST Travel) हा हजारो प्रवाशांसाठी अविभाज्य भाग आहे. महिलांसाठी तिकीटात ५०% सूट तर काही प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. एसटी प्रशासनाने विविध गटांसाठी सवलतीच्या आणि मोफत प्रवासाच्या योजना लागू केल्या आहेत.

कोणाला मिळतो मोफत प्रवास?
- स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे एक साथीदार – वर्षभर मोफत प्रवास(ST Travel)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते आणि एक साथीदार – वर्षभर मोफत प्रवास
- अहिल्याबाई होळकर योजना – ग्रामीण भागातील ५वी ते १२वीच्या मुलींना मोफत प्रवास
- राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक – सर्व एसटी बसमध्ये मोफत प्रवास
- अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त खेळाडू – वातानुकुलित बससह मोफत प्रवास
- आदिवासी पुरस्कार विजेते आणि त्यांचे साथीदार – वर्षभर मोफत प्रवास
- पंढरपूरच्या शासकीय पुजेसाठी निवडलेले वारकरी दाम्पत्य – वर्षभर मोफत प्रवास
- विद्यमान आणि माजी विधानमंडळ सदस्य आणि एक साथीदार – वर्षभर मोफत प्रवास
सवलतीसह प्रवास करणारे प्रवासी
- ६५-७५ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक – ५०% सूट
- विद्यार्थी मासिक पास – ६६.६७% सूट
- दिव्यांग व्यक्ती – ७०-७५% सूट
- क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग असलेले रुग्ण – ७५% सूट
- शासनमान्य पत्रकार – ८००० किमीपर्यंत मोफत प्रवास
नोकरदार वर्गाला बस पासची सुविधा
पूर्वी मासिक आणि तीन महिन्यांच्या पासमध्ये प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सवलत दिली जायची. यामध्ये ५० दिवसांचे तिकीट शुल्क आकारले जात होते, त्यामुळे रोजच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळायचा.
एसटीच्या या सवलती आणि मोफत प्रवासाच्या योजना प्रवाशांसाठी मोठी सोय ठरत आहेत. मात्र, यामधून उत्पन्नाचे मोठे नुकसान होत असल्याने एसटी महामंडळ पुढे मोठे आर्थिक आव्हान उभे आहे.
हेही वाचा :
‘महिलांना ब्रा साईजनुसार मिळणार…’; पबच्या ‘या’ ऑफरने उडाली खळबळ
जो दुसऱ्यांसाठी मेला , तो कायमचा जगला….!
अहिल्यानगर मध्ये कुस्ती परंपरा झाली “धोबीपछाड”